12 वर्षीय मुलाला मिळाली मूल्यवान वस्तू
अनेकदा खेळताना मुलांना काहीतरी मूल्यवान गोष्ट सापडत असते. परंतु एका मुलाला खेळताना एक जुनी वस्तू मिळाली. याची पडताळणी करण्यात आल्यावर ती अत्यंत मूल्यवान निघाली आहे. ब्रिटनच्या ससेक्समध्ये 12 वर्षीय रोवन ब्रॅननला मैदानात एक जुने ब्रेसलेट मिळाले, त्याची आईला त्याला हे ब्रेसलेट उचलू नको असे सांगत राहिली, परंतु त्याने ते घरी आणले होते. यासंबंधी पडताळणी केल्यावर हे ब्रेसलेट अत्यंत मूल्यवान आणि ऐतिहासिक असल्याचे समोर आले आहे.
12 वर्षीय रोवन स्वत:ची आई अमांडासोबत मैदानात डॉगवॉकसाठी गेला होता, तेथे त्याने एक बँड पाहिला होता, प्रथम त्याला हा किरकोळ बँड वाटला, परंतु यासंबंधी अधिक चौकशी केल्यावर हा 2 हजार वर्षे जुने सोन्याचे ब्रेसलेट असल्याचे समजले. हे ब्रेसलेट अत्यंत दुर्लभ खजिन्याचा हिस्सा राहिले असावे असे मानले जात आहे.
आर्मीलिया प्रकारातील हे रोमन ब्रेसलेट आता ब्रिटिश म्युझियममध्ये अध्ययनासाठी ठेवण्यात आले आहे. रोवलला नेहमीच जुन्या गोष्टी शोधण्याचा छंद राहिला आहे. तो अॅडव्हेंचर प्रेमी असून नेहमीच जमिनीवरून अनेक गोष्टी उचलत असतो. अस्वच्छ गोष्ट उचलू नको असे आम्ही त्याला वारंवार सांगत असतो असे अमांडा यांनी म्हटले आहे.
ब्रेसलेटविषयी त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. तसेच त्याविषयी सातत्याने माहिती मिळवित राहिले. पडताळणीत हे ब्रेसलेट पहिल्या शतकात रोमन सैनिकांना शौर्यासाठी देण्यात येणारे खास आर्मीलिया ब्रेसलेट असल्याचे स्पष्ट झाल्याचे अमांडा यांनी सांगितले आहे.