10 फूट लांब, 88 पाय असणारा जीव
अनेक वर्षांच्या संशोधनानंतर वैज्ञानिकांनी पृथ्वीवरील सर्वात मोठ्या कीड्याच्या रहस्याची उकल केली आहे. 10.5 फूट लांब आणि 88 पाय असलेल्या आणि दानवासारख्या दिसणाऱ्या या कीड्याविषयी वैज्ञानिक अनेक वर्षांपासून संशोधन करत होते.
आर्थ्रेप्ल्युरा नावाच्या या कीड्याचा वैज्ञानिकांनी पूर्ण शारीरिक संरचना तयार केली आहे. हा कीडा 30 कोटी वर्षांपूर्वी कार्बेनिफेरस युगात अस्तित्वात होता. अलिकडेच दोन जीवाश्मांच्या शोधानंतर आता वैज्ञानिक याच्या शिराची संरचना तयार करण्यास यशस्वी ठरले आहेत. नव्या संशोधनामुळे या किटकाविषयी आणखी माहिती प्राप्त झाली आहे.
वैज्ञानिक आर्थ्रोप्ल्युराच्या तुकडे आणि जीवाश्मांद्वारे त्याच्याविषयी खूप काही जाणून होते, परंतु बहुतांश जीवाश्मांमध्ये त्याचे शीरच नव्हेत. कारण हे किडे स्वत:च्या बाहेरील संचरनेला सोडून देत होते. आता फ्रान्समध्ये मिळालेल्या या जीवाश्मांनी या रहस्याची उकल केली आहे. आर्थ्रोप्ल्युराचे शरीर 24 हिस्स्यांमध्ये विभागलेले होते आणि याच्या प्रत्येक हिस्स्यात 4 पाय होते. अशाप्रकारे मिळून या जीवाला एकूण 88 पाय होते. जमिनीवर चालणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ज्ञात आर्थ्रोपोड होता, जो किडे, कोळी आणि खेकड्यांच्या समुहाशी संबंधित होता.
याचे तोंड लहान होते आणि पानं तसेच साल खाण्याच्या दृष्टीने त्याची रचना होती, यामुळे हा जीव शाकाहारी होता असे स्पष्ट होते. हा रोपांच्या सडलेल्या हिस्स्यांना खाणारा आणि मंदगतीने चालणारा जीव होता असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.
आतापर्यंतचा सर्वात मोठा किटक
फ्रान्सच्या विलेरबनमध्ये युनिव्हर्सिटी क्लाउड बर्नार्ड लियोनमध्ये अध्ययनाचे सहलेखक आणि जीवाश्म शास्त्रज्ञ मिकेल लेरिटियर यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. याचे शरीर मिलीपेडसारखे होते, तर याचे शरीर सेंटीपीडप्रमाणे होते. सर्वात मोठा आर्थ्रोप्लुरा बहुधा आतापर्यंतचा सर्वात मोठा किटक राहिला असेल. परंतु यावर अद्याप चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अनेक वर्षांपासून संशोधन
युरोप आणि उत्तर अमेरिकेचे संशोधक 1800 च्या दशकापासून विशाल किटकांचे अवशेष आणि पाऊलखुणांवर अध्ययन करत आहेत. आम्ही दीर्घकाळापासून या जीवाचे शीर कशास्वरुपाचे हेते हे पाहू इच्छित होते. शीराचे मॉडेल तयार कण्यासाठी संशोधकांनी सर्वप्रथम 1980 च्या दशकात फ्रेंच कोळसा खाणीत आढळलेल्या जीवाश्मांच्या नमुन्यांचे अध्ययन करण्यासाठी सीटी स्कॅनचा वापर केला होता असे वेस्ट वर्जीनिया विद्यापीठाचे जीवाश्म तज्ञ जेम्स लॅम्सडेल यांनी सांगितले आहे.