9 कंपन्यांचे बाजारमूल्य 2.89 लाख कोटींनी वाढले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आघाडीवरील दहापैकी नऊ कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 2.89 लाख कोटी रुपयांनी वाढले होते. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य सर्वाधिक वाढलेले पाहायला मिळाले.
सेन्सेक्सची भक्कम वाटचाल
मागच्या आठवड्यामध्ये शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1822 अंकांनी म्हणजेच 2.36 टक्के इतका दमदार वाढला होता. आघाडीच्या नऊ कंपन्यांचे बाजारमूल्य मागच्या आठवड्यात 2 लाख 89 हजार 699 कोटी रुपयांनी वाढलेले होते. बीएसई सेन्सेक्सने जून महिन्यामध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ दर्शवली आहे. जूनमध्ये सेन्सेक्सची वाढ ही 7.14 टक्के इतकी दिसून आली आहे. याचसोबत गुरुवारी या निर्देशांकाने 79 हजारचा विक्रमी टप्पाही पार केला होता.
यांचे भांडवल मूल्य मजबूत
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 1 लाख 52 हजार 264 कोटींनी वाढून 21 लाख 18 हजार 952 कोटी रुपयांवर पोहोचले होते. याच दरम्यान आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 34,733 कोटी रुपयांनी वाढून 14 लाख 12 हजार 845 कोटी रुपयांवर राहिले होते. त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल मूल्य 30 हजार 286 कोटी रुपयांनी वाढून 8 लाख 44 हजार 201 कोटी रुपयांवर राहिले होते. भारती एअरटेल या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीचे बाजार भांडवलसुद्धा 18,267 कोटी रुपयांनी मागच्या आठवड्यात वाढले होते. आता त्यांचे एकूण बाजार भांडवलमूल्य शुक्रवारी 8 लाख 22 हजार 530 कोटी रुपये होते.
आणखीन एक आयटी कंपनी इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 14,656 कोटींनी वाढत 6 लाख 50 हजार 602 कोटी रुपयांवर आले होते.