For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

97 टक्के क्रेडिट कार्डधारकांवर कर्ज

06:44 AM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
97 टक्के क्रेडिट कार्डधारकांवर कर्ज
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतात क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. या वापरकर्त्यांच्या एकंदर व्यवहारावर नजर फिरवली असता अध्ययनात 97 टक्के क्रेडिड कार्डधारकांनी एक तर कर्ज घेतलेले आहे किंवा मग समान मासिक हप्ता (इएमआय) भरत आहेत, असे दिसून आले आहे.

फिनटेक कंपनी क्रेड यांच्या सर्व्हेक्षणात ही माहिती समोर आली आहे. मागच्या महिन्यात कंपनीने सर्व्हेक्षण केले होते. त्यात 5151 वेतनदारांनी किमान एक क्रेडिट कार्ड असल्याचे म्हटले आहे. दिल्ली-एनसीआर, मुंबई, बंगळूर आणि चेन्नई या शहरातील सर्व्हेत वरील माहिती दिली गेली. यापैकी 95 टक्के जणांना क्रेडिट स्कोअरचे महत्त्व लक्षात आलेले आहे. यातही पुन्हा 54 टक्के आपली गुंतवणूक वाढवू इच्छितात, 38 टक्के व्यवसाय सुरु करु शकतात, 30 टक्के शिक्षण घेऊ शकतात आणि 47 टक्के जण आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी धडपडतील, असेही सर्व्हेत दिसले आहे. क्रेडिट कार्डचा एकंदर वापर पाहिला असता 97 टक्के जणांनी त्यावर कर्ज घेतलेले आहे किंवा मग इएमआय भरत आहेत, असे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.