For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यस्तरीय स्थानिक संघांच्या थेट भरतीमध्ये 9695 पदे निश्चित

11:29 AM Dec 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यस्तरीय स्थानिक संघांच्या थेट भरतीमध्ये 9695 पदे निश्चित
Advertisement

मंत्री डी. सुधाकर यांचे विधानपरिषदेत स्पष्टीकरण

Advertisement

बेंगळूर : 371(जे) कायद्यानुसार राज्यभरातील सरकारी भरतीमध्ये राज्यस्तरीय स्थानिक संघांच्या थेट भरतीमध्ये 9695 पदे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी 5,977 पदे भरण्यात आली आहेत, असे नियोजन, कार्यक्रम समन्वय व सांख्यिकी मंत्री डी. सुधाकर यांनी सांगितले. 371(जे) कायद्यान्वये राज्यभरातील सरकारी भरतीमध्ये राज्यस्तरीय स्थानिक संघाच्या थेट भरतीसाठी 9695 पदे ओळखण्यात आली आहेत. त्यापैकी 5977 पदे भरण्यात आली आहेत, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी विधानपरिषदेत सदस्य जगदेव गुत्तेदार यांच्या चिन्हांकीत प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.

371(जे) अंतर्गत राज्यभरात विविध भर्ती संस्थांमध्ये 1658 पदांची भरती प्रक्रिया सुरू असून 2035 पदे भरण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. अलीकडेच कलबुर्गी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरल्याप्रमाणे काम करण्यासाठी सर्व विभागांना रिक्त पदे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. 371(जे) अन्वये नियुक्त कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या मुद्द्यांवर प्राधान्याने चर्चा केली जाईल. संबंधित विभागांचे उप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिवांना लेखी नोटीस देऊन प्रश्न सोडविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.