For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूत 39 जागांसाठी 950 उमेदवार रिंगणात

06:37 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूत 39 जागांसाठी  950 उमेदवार रिंगणात
Advertisement

करूर मतदारसंघात सर्वाधिक 54 उमेदवारांची भाऊगर्दी

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूमधील 39 लोकसभा मतदारसंघांमध्ये 19 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 950 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सत्यब्रत साहू यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख शनिवारी संपल्यानंतर रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले. त्यानुसार, 874 पुऊष आणि 76 महिला असे एकंदर 950 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच 30 मार्च रोजी 135 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. 28 मार्च रोजी अर्ज छाननीच्या दिवशी एकूण 1,085 नामनिर्देशनपत्रे वैध असल्याचे आढळून आले होते.

Advertisement

कावेरी डेल्टा प्रदेशातील नागापट्टीनम मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे नऊ उमेदवार आहेत. पश्चिम विभागातील करूर मतदारसंघात सर्वाधिक 54 उमेदवार आहेत. दक्षिण तामिळनाडूमधील थुथुकुडी मतदारसंघात द्रमुक नेत्या आणि विद्यमान खासदार कनिमोझी यांच्यासह 28 उमेदवार आहेत. इरोड मतदारसंघात अण्णा द्रमुक उमेदवार ‘आत्राल’ अशोक कुमार यांच्यासह 31 जण आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. अशोक कुमार हे तामिळनाडूतील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रात 583.48 कोटी ऊपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

दक्षिण चेन्नईमध्ये तेलंगणाच्या माजी राज्यपाल आणि भाजप नेत्या तमिलिसाई सुंदरराजन निवडणूक लढवत असून त्यांच्यासह 41 उमेदवार आहेत. शिवगंगामध्ये काँग्रेसचे उमेदवार कार्ती पी. चिदंबरम यांच्यासह 20 स्पर्धक आहेत. केंद्रीय मंत्री एल मुऊगन निवडणूक लढवत असलेल्या निलगिरीमध्ये 16 उमेदवार आहेत. कोईम्बतूरमध्ये भाजपने प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांना उमेदवारी दिली असून त्यांचा 37 जणांशी सामना रंगणार आहे.

Advertisement
Tags :

.