For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनपाकडून 95 किलो प्लास्टिक जप्त

12:02 PM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनपाकडून 95 किलो प्लास्टिक जप्त
Advertisement

25 हजार रुपये दंडही आकारला : आरोग्य विभागाच्या कारवाईने व्यावसायिकांमध्ये खळबळ

Advertisement

बेळगाव : शहरामध्ये पुन्हा प्लास्टिक वापराविरोधात महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी महानगरपालिकेतील आरोग्य आणि प्रदूषण विभागाने 95 किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच 25 हजार 500 रुपये दंडही जमा केला आहे. यामुळे पुन्हा प्लास्टिक वापर करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणूक, तसेच इतर कारणांनी प्लास्टिक विरोधातील मोहीम थंडावली होती. मात्र, आता पुन्हा ही मोहीम राबविण्यास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. शहरातील कॉलेज रोड, केएलई रोड परिसरामध्ये जाऊन विविध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. मनपातील आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण विभागाचे अभियंता आदिल खान यांच्यासह आरोग्य निरीक्षकांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

Advertisement

स्वीट मार्ट, किराणा दुकाने, हॉटेल्स व इतर व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर करत पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप होत होता. प्लास्टिक घेऊन रस्त्यावरच फेकून देणे, असे प्रकार वाढल्यामुळे महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अचानकपणे महानगरपालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे व्यावसायिकांना भुर्दंड बसला आहे. प्लास्टिकसाठी प्रथम पर्याय उपलब्ध करावा. त्यानंतर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Advertisement
Tags :

.