महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंधन टँकरच्या स्फोटात नायजेरियात 94 ठार

06:48 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अपघातग्रस्त टँकरमधून पेट्रोल चोरत असताना आगीचा भडका

Advertisement

वृत्तसंस्था/ अबुजा

Advertisement

नायजेरियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पेट्रोल टँकरच्या स्फोटात 94 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच स्फोटात 50 लोक गंभीर जखमी झाल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. अपघाताशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये संपूर्ण परिसरात मोठी आग दिसत आहे. घटनास्थळी मृतदेह विखुरलेले दिसत आहेत.  जखमींना जवळच्या स्थानिक ऊग्णालयात नेण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पेट्रोल टँकरमध्ये झालेल्या स्फोटाची ही घटना उत्तर नायजेरियातील जिगावा राज्यात घडली. चालकाचे वाहकावरील नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. त्यानंतर टँकरमधून पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी झाली असता पेट्रोल टँकरचा स्फोट झाला. जिगावा पोलिसांच्या प्रवक्त्याने याप्रकरणी अधिक माहिती दिली आहे. टँकर उलटल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यातून पेट्रोल भरण्यास सुऊवात केली. त्यानंतर मोठा स्फोट होऊन आग लागली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. ही घटना बुधवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी 48 जणांचा मृत्यू

नायजेरियातील बहुतांश अपघात हे बेपर्वा वाहन चालवणे आणि खराब रस्त्यांमुळे होतात. गेल्या महिन्यात नायजेरियाच्या उत्तर-मध्य नायजर राज्यात इंधन टँकर आणि ट्रकची टक्कर झाल्यानंतर एक स्फोट झाला. या अपघातात किमान 48 लोक ठार झाले होते. 2020 मध्ये पेट्रोल टँकर अपघाताची 1,500 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली. या अपघातांमध्ये 535 जणांचा मृत्यू झाला तर 1,142 जण जखमी झाले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article