For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोकणची पोरं हुशार ; राज्यात बारावीचा निकाल 93.37 टक्के

12:17 PM May 21, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कोकणची पोरं हुशार   राज्यात बारावीचा निकाल 93 37 टक्के
Advertisement

सावंतवाडी- 

Advertisement

पुन्हा एकदा कोकण विभाग राज्यात अव्वल

Maharashtra HSC Class 12 Results : पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (Maharashtra HSC Results 2023 Declared) इयत्ता बारावीचा निकाल (12th Results) जाहीर झाला आहे. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना mahresult.nic.inया वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

Advertisement

यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.

विभागनिहाय निकाल
कोकण : 97.51 टक्के
पुणे : 94.44 टक्के
कोल्हापूर : 94.24 टक्के
अमरावती : 93 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
नाशिक : 94.71 टक्के
लातूर : 92.36 टक्के
नागपूर : 93.12 टक्के
मुंबई : 91.95 टक्के
कुठे पाहता येणार निकाल?

mahresult.nic.in

Advertisement
Tags :

.