92 वर्षीय वयोवृद्ध मारुती साळवी यांनी बजावला मतदानाचा हक्क
गुहागर :
264 गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले व पात्र दिव्यांग असलेले मतदारांसाठी घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया राबवली जात असून गुहागर तालुक्यातील काजुर्ली मळेवाडी येथील मारुती साळवी या 92 वर्षीय मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे मतदान हा आपला हक्क आहे आणि तो सर्वांनी बजावावा अशा प्रकारचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गुहागर तालुक्यात गुरुवारपासून गृह मतदान प्रक्रिया निवडणूक विभागाच्या वतीने सुरू आहे. गुहागर मतदारसंघामध्ये एकूण ७६८ वयोवृद्ध व १३६ दिव्यांग अशा एकूण ९०४ मतदारांचे गृह मतदानाद्वारे मतदान घेण्यात येत आहे. यासाठी गुहागर तालुक्यात १३ पथके, चिपळूण तालुक्यात १० पथके व खेड तालुक्यात १० अशी एकूण ३३ पथके तयार करण्यात आली आहेत. गुरुवारी 14 नोव्हेंबर रोजी ३२७ मतदारांचे मतदान पूर्ण झाले असून 17 नोव्हेंबर पर्यंत गृह मतदानाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.