900 वर्षे जुनी ‘चेटकीण’
तोंडात कोंबण्यात आली होती वीट
वैज्ञानिकांनी 16 व्या शतकातील एका महिलेच्या चेहऱ्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने रिक्रिएट केले आहे. तिच्या तोंडात वीट कोंबण्यात आली होती. यामागे तिने मृत व्यक्तींना खाऊ नये म्हणुन असे करण्यात आले होते. इटलीच्या स्थानिक लोकांचे मानणे होते कीही महिला वॅम्पायर होती. या कहाणीबद्दल लाजारेटो नुओवोच्या एका बेटावर दफनभूमीचा शोध लागल्यावर कळले आहे. 1500 ते 1600 च्या शतकाच्या अखेरीस बुबोनिक प्लेगच्या साथीदरम्यान क्वारंटाइनच्या स्वरुपात या ठिकाणाचा वापर करण्यात आला होता. 2006 मध्ये पुरातत्व अध्ययनांमध्ये असे काही मृतदेह मिळाले आहेत, जे शतकांपूर्वी दफन करण्यात आले होते.
फॉरेन्सिक संशोधक सिसरो मोरेस यांनी या विचित्र शोधाविषयी माहिती दिली आहे. कथित स्वरुपात एक वॅम्पायर जिला लोक चेटकीण म्हणत होते, तिच्याबद्दल कळले आहे. त्या काळातील लोकप्रिय दंतकथेनुसार प्लेगसाठी जबाबदार लोकांपैकी ती एक होती. यामुळे तिच्या तोंडात सुरक्षात्मक उपाय म्हणून एक वीट कोंबण्यात आाrल होती. यामुळे तिला अन्य लोकांना संक्रमित करण्यापासून रोखता येईल असे त्यांचे सांगणे आहे.
रिकंस्ट्रक्शन तंत्रज्ञानाचा वापर करत मोरेस यांनी ती जिवंत असताना तिच्या तोंडात वीट कोंबण्यात आली होती का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तपासणीत ती जिवंत असतानाच हा प्रकार घडल्याचे समोर आले. कारण तिच्या दातांना नुकसान पोहोचले नव्हते. तसेच शरीराच्या पेशींचीही हानी झाली नव्हती. स्वाभाविकपणे तिच्या मृत्यूनंतर असे करणे सोपे ठरले असते असे त्यांनी म्हटले आहे.
भूत पळवून लावण्यासाठी तिच्या तेंडात वीट कोंबली असण्याचीही शक्यता आहे. जेणेकरून मेल्यावर तिने इतरांचा चावा घेत त्यांना संक्रमित करू नये असेही बोलले जाते. जी कवटी मिळाली आहे ती एका कनिष्ठ वर्गातील युरोपीय महिला होती जिचा मृत्यू वयाच्या 61 व्या वर्षी झाला होता असे अध्ययनातून समोर आले आहे.
नव्या अध्ययनासाठी वैज्ञानिकांनी कवटीला पुन्हा रिक्रिएट केले आणि स्टायरोफोमने एक वीट तयार केली. याद्वारे वीट तोंडात कोंबण्याचा प्रकार मृत्यूपूर्वी झाला होता का मृत्यूनंतर हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु या शतकांपेक्षा जुन्या रहस्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हाडं आणि हाडांचे अन्य हिस्से कायम ठेवून तोंडात वीट कोंबणे शक्य आहे का या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकतो असे मोरेस यांना वाटत आहे.