For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

900 कुकी दहशतवादी म्यारमारमधून मणिपूरमध्ये!

06:15 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
900 कुकी दहशतवादी म्यारमारमधून मणिपूरमध्ये
Advertisement

घुसखोरी उघडकीस : ड्रोन-क्षेपणास्त्र हल्ल्याचे प्रशिक्षण घेतल्याचेही स्पष्ट : मैतेईबहुल भागात हल्ल्यांचा धोका

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

म्यानमारमधून मणिपूरमध्ये 900 कुकी दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राज्याचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या तीन-चार दिवसांपासून दहशतवाद्यांच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. घुसखोरी करणारे दहशतवादी ड्रोन, बॉम्ब, प्रोजेक्टाइल, क्षेपणास्त्रे आणि गनिमी युद्धाचा वापर करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. ते 30-30 लोकांच्या गटात असून वेगवेगळ्या भागात लपून बसले आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली असून मैतेईबहुल भागात हल्ल्यांचा धोका वाढला आहे.

Advertisement

मणिपूरमध्ये गेल्या पंधरवड्यापासून पुन्हा एकदा संघर्ष व हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. कुकी आणि मैतेई गटांमध्ये सुरू असलेले वाद कायम असून त्यांना दिवसेंदिवस अधिक भडकाऊ स्वरुप प्राप्त होत आहे. कुकी दहशतवाद्यांच्या घुसखोरीमुळे हा संघर्ष आणखीनच तीव्र होऊ शकतो. 28 सप्टेंबरच्या सुमारास कुकी दहशतवादी मैतेई समाजाची वस्ती असलेल्या गावांवर हल्ला करू शकतात, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या हल्ल्याच्या भीतीने चुराचंदपूर, तेंगनौपाल, उखऊल, कमजोंग आणि फेरजौलसह अनेक जिह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये आरक्षणावरून हिंसाचार सुरू आहे. सरकारी आकडेवारीनुसार, हिंसाचारात आतापर्यंत 237 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1,500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 60 हजारांहून अधिक लोकांनी आपली घरे सोडली आहेत.

Advertisement
Tags :

.