For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोळसा खाणस्फोटात चीनमध्ये 90 ठार

06:12 AM May 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
कोळसा खाणस्फोटात चीनमध्ये 90 ठार
Advertisement

बचावकार्य गतिमान : अनेक जण अद्याप बेपत्ता

Advertisement

वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनच्या शांक्सी प्रांतातील लिउशेन्यू कोळसा खाणीत शुक्रवारी रात्री उशिरा एक मोठा गॅस स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत जवळपास 90 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी देण्यात आली. खाणीतील धोकादायक ठिकाणी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव आणि मदत पथके अथक प्रयत्न करत आहेत. अपघाताच्या वेळी या खोल खाणीत एकूण 247 कामगार काम करत होते. काही कामगार अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि पंतप्रधान ली केकियांग यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच अपघातामागील अचूक कारण शोधून काढण्याचा कडक आदेशही त्यांनी दिला.

Advertisement

शांक्सी प्रांतातील ही भीषण खाण दुर्घटना गेल्या दशकातील सर्वात प्राणघातक दुर्घटना मानली जात आहे. खाणीतील स्फोटानंतर लगेचच राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी सर्व अधिकाऱ्यांना बचावकार्य गतिमान करण्यासाठी कडक सूचना दिल्या. खाणीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी आणि जखमींना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी कोणतीही कसर सोडू नये, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई केली आहे. खाणीसाठी जबाबदार असलेल्या कंपनीच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान ली केकियांग यांनीही या घटनेत कठोर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

.

Advertisement
Tags :

.