9 वर्षीय मुलाला मिळाली अनमोल वस्तू
सागर किनारी मिळालेली वस्तू पाहून सर्व दंग
एखाद्या ठिकाणी फिरताना कुठलीही अनमोल वस्तू मिळावी असे अनेकांना वाटत असते, परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुदैव नसते. पण इंग्लंडच्या 9 वर्षीय मुलाला ही सुवर्णसंधी मिळाली आहे. हा मुलगा समुद्रकिनारी फिरत अतसाना त्याला एक चमकदार वस्तू दिसून आली. ही वस्तू हातात घेतल्यावर ती नेमकं काय आहे हे त्याला समजले नाही. मग त्याने ती उचलून घरात आणली, नंतर तज्ञांनी ती पाहिल्यावर हा अनमोल खजिना असल्याचे स्पष्ट झाले.
बेन विटन नावाचा हा मुलगा ससेक्सच्या शोरहम बीचवर फिरत असताना त्याला दगडाचा एक तुकडा मिळाला. मी इकडे तिकडे पाहत असतो आणि मला हा चमकदार दगड दिसून आला. अन्य सर्व दगडांमध्ये हा वेगळा दिसून येत होता, याचमुळे हा खास असावा. मी हा तुकडा उचलून घरी आणला. अनेक वर्षांपर्यंत स्वत:च्या खोलीत ठेवला होता. अनेकदा तो हरवला देखील परंतु प्रत्येकवेळी तो मिळत गेला. पण मी जेव्हा वर्थिंग म्युझियममध्ये गेलो तेव्हा माझे नशीबच बदलून गेल्याचे बेनने सांगितले आहे.
वर्थिंग म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या वस्तू पाहत असताना त्याला एक अशी गोष्ट दिसून आली, जी त्याच्याकडील दगडाशी मिळतीजुळती होती. त्याने या वस्तूचे बारकाईने निरीक्षण केले. यानंतर त्याला स्वत:कडील दगडाविषयी म्युझियमला सांगावे असे वाटले. स्वत:कडील वस्तू त्याने म्युझियमच्या तज्ञाला दाखविताच सर्वजण चकित झाले.
60 हजार वर्षे जुनी
बेनकडील तुकडा हा मध्य पाषाण काळातील कुऱ्हाड होती, जी 40 ते 60 हजार वर्षे जुनी होती. त्याकाळात निएंडरथलचे अस्तित्व होते. या कुऱ्हाडीची निर्मिती निएंडरथलनेच केली होती. असे म्युझियमच्या तज्ञाने सांगितले आहे.
आमच्याकडे लोक अशा गोष्टी घेऊन येत असतात, परंतु या मुलाने जी गोष्ट शोधली आहे ती अनमोन आहे. 10 वर्षांपासून मी अशी वस्तू पाहिली नव्हती. ससेक्समध्ये निएंडरथलच्या हातून निर्मित कुऱ्हाड मिळणे दुर्लभ गोष्ट असल्याचे म्युझियममधील आर्कियोलॉजिस्ट जेम्स सेन्सबरी यांनी सांगितले आहे.
पुढे काय होणार?
पूर्वी मी हा तुकडा स्वत:कडे राखू इच्छित होतो, परंतु माझ्या हातात राहण्यापेक्षा तो म्युझियममध्sय ठेवणे अधिक चांगले ठरेल असे वाटले. तेथे लाखो लोक तो पाहू शकतील आणि त्याविषयी जाणून घेऊ शकतील असे बेन विटनने म्हटले अहे. बेनने आम्हाला पुढील फेब्रुवारीपर्यंत ही कुऱ्हा ठेवण्यासाठी दिली आहे. त्यानंत ती त्याला परत केली जाणार आहे. आम्ही याला ब्रिटिश म्युझियमच्या पोर्टेबल पुरातन अवशेष योजनेच्या अंतर्गत नोंद करणार आहोत, जेणेकरून कायमस्वरुपी याचा तपशील नोंद राहिल असे सेन्सबरी यांनी सांगितले आहे.