For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भीषण रस्ते अपघातात छत्तीसगडमध्ये 9 ठार

06:15 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
भीषण रस्ते अपघातात छत्तीसगडमध्ये 9 ठार
Advertisement

मृतांमध्ये 5 महिला, 4 मुले : भरधाव पिकअपची ट्रकला धडक

Advertisement

वृत्तसंस्था/ बेमेतरा

छत्तीसगडमधील बेमेतरा येथील काथिया गावात सोमवारी भीषण रस्ते अपघात झाला असून त्यात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  प्रवाशांनी भरलेल्या पिकअप व्हॅनने रस्त्यावर उभ्या असलेल्या टाटा 407 वाहनाला धडक दिल्याने हा अपघात घडला. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअप व्हॅन टाटा 407 वर आदळल्याने 9 जणांचा मृत्यू झाला. तसेच लहान मुलांसह 23 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 6 जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रायपूर येथील एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर बेमेतरा आणि सिमगा येथील सीएचसी ऊग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

अपघातग्रस्त पिकअपमधील लोक तिरैया गावातून समाधी अर्पण कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परतत असताना काठीया गावाजवळ हा अपघात झाला. या घटनेत चार मुलांसह 5 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अपघात झालेल्या पिकअप व्हॅनमधून एकाच कुटुंबातील 30 हून अधिक लोक प्रवास करत होते. सर्व लोक पाथरा गावातील रहिवासी असून साहू समाजाचे आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरातील आमदार दीपेश साहू हेही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या घटनेत जखमी झालेल्या सर्वांवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या.

Advertisement
Tags :

.