For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयएस’च्या 9 जणांना फिलिपाईन्समध्ये कंठस्नान

06:40 AM Jan 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयएस’च्या 9 जणांना फिलिपाईन्समध्ये कंठस्नान
Advertisement

मनिला :

Advertisement

फिलिपाईन्सच्या दक्षिणेकडील लानाओ डेल सुर प्रांतात झालेल्या चकमकीत फिलिपाईन्सच्या सैन्याने नऊ संशयित दहशतवाद्यांना ठार केले आहे. लष्कराच्या प्रवक्त्याने शनिवारी ही माहिती दिली. लष्करी सैन्याने इस्लामी सशस्त्र गटाच्या कथित सदस्यांना ठार केल्याचे फिलिपाईन्स आर्मी कर्नल लुई डेमा-अला यांनी शनिवारी सांगितले. मुस्लीम मिंडानाओमधील बांगसामोरो स्वायत्त प्रदेशातील प्रांतातील एका गावात हा संघर्ष झाल्याचे सांगण्यात आले. 15 पैकी नऊ दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी मिळाली आहे. यातील दोन दहशतवाद्यांचा डिसेंबर 2023 मध्ये मारावी शहरात झालेल्या प्राणघातक बॉम्बस्फोटात सहभाग होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.