महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नव्या वाहतूक परवान्यांद्वारे नऊ कोटीचा महसूल गोळा

11:39 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : चालू वर्ष 2023 च्या गेल्या 10 महिन्यांत म्हणजे जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत वाहतूक खात्याने 26 हजार 500 वाहन परवाने दिले असून त्याद्वारे सुमारे ऊ. 9 कोटीचा महसूल खात्याला प्राप्त झाला आहे. त्याच काळात सुमारे 49 हजार 500 शिकावू वाहन परवाने जारी करण्यात आल्याची माहिती खात्यातील सुत्रांनी दिली आहे. उपरोक्त वाहन परवान्यांत दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व इतर अवजड वाहनांच्या परवान्यांचा समावेश आहे. वरील काळात वाहन परवान्यांसाठी एकूण 27 हजार अर्ज आले होते. त्यातील बहुतेकांना वाहन परवाने देण्यात आले म्हणजे परवाने देण्याचे प्रमाण जवळपास 99 टक्के एवढे असल्याचे समोर आले आहे. शिकावू परवान्यांसाठी अंदाजे 51 हजारपेक्षा जास्त अर्ज आले होते. त्यातील 49,500 अर्जांना मंजुरी देण्यात आली. मडगाव आरटीओ कार्यालयाने सर्वात जास्त म्हणजे 5800 च्या आसपास परवाने दिले तर म्हापसा आरटीओने 5300 परवाने जारी केले आहेत. पणजीतून 3500 परवाने मिळाले तर धारबांदोडा येथून सर्वात कमी म्हणजे 350 च्या आसपास परवाने देण्यात आले. काणकोण-680, पेडणे-1100, केपे-1800, वास्को-2400, डिचोली-2600, फोंडा-2800 असे परवाने वाहन धारकांना देण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article