For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये आठवी राष्ट्रीय परिषद संपन्न

05:17 PM Feb 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
भोसले फार्मसी कॉलेजमध्ये आठवी राष्ट्रीय परिषद संपन्न
Advertisement

औषध संशोधनाचा नवा अध्याय

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “औषध शोध आणि विकासातील प्रगत तंत्रज्ञान” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेस महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरातसह विविध राज्यांतून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ६० पेक्षा अधिक शोधनिबंधपर भित्तीपत्रकांचे सादरीकरण करण्यात आले.प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी औषधनिर्माणशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख अतिथी डॉ. सुनीलकुमार बोथरा, प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरी यांनी संशोधन प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ.तितीक्ष देवळे, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, गोवा यांनी एआय आणि मशीन लर्निंगमुळे औषध शोध प्रक्रियेत होत असलेल्या क्रांतिकारी बदलांवर मार्गदर्शन केले. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे अमोघ दांडेकर यांनी औषधनिर्मितीतील सुरक्षा व नियामक अनुरूपतेबाबत माहिती दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.यावेळी शोधनिबंधपर भित्तीपत्रक स्पर्धा पार पडली. पदवी विभागात यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या काजल आडणेकर हिने प्रथम, लोहित तावडे याने द्वितीय तर ज्ञानदीप कॉलेज ऑफ फार्मसी, खेड येथील सानिका मोरे आणि सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तोंडवली येथील विश्रुती विचारे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. पदविका विभागात यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या मृण्मयी सावंत हिने प्रथम व मासिरा नदाफ हिने द्वितीय क्रमांक मिळवला.पदव्युत्तर व विद्यावाचस्पती विभागात भारती विद्यापीठ, कोल्हापूरच्या जिज्ञासा पंतवालावलकर हिने प्रथम, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रमदा नाईक हिने द्वितीय व डी.वाय.पाटील फार्मसी कॉलेज आकुर्डीच्या कांचन नाईक हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्यांना प्रमाणपत्र व विजयचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.नमिता भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. तुषार रुकारी यांनी केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.