आय-कार्डमुळे 8 वीच्या विद्यार्थ्याचा झाला मृत्यू
मेरठ :
उत्तरप्रदेशच्या मेरठ येथील एका 8 वीत शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुलाने गळ्यात आयकार्ड घातले होते आणि आयकार्डची रिबन गळ्याला आवळली गेल्याने मुलाचा श्वास कोंडला आणि त्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मेरठमधील 8 वीचा विद्यार्थी लक्ष्यचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे. आयकार्डच्या रिबनमुळे त्याचा गळा आवळला गेला आणि श्वास केंडला गेल्याने मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
बीएसएफ जवान दीपक कुमार यांचा पुत्र लक्ष्य सैन्यशाळेत शिकत होता. शाळेतून आल्यावर कपडे बदलण्यासाठी घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत तो गेला होता, परंतु तो बराच वेळ बाहेर न आल्याने त्याची आई तेथे पोहोचली असता लक्ष्य जमिनीवर उलटा पडलेला दिसून आला. यादरम्यान त्याच्या गळ्यात आयकार्डची रिबन अडकलेली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तेथे जात तपास सुरु केला आहे.