For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आतापर्यंत 89 इंच पाऊस

11:43 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आतापर्यंत 89 इंच पाऊस
Advertisement

सांगेसह वाळपई केंद्रात इंचाचे शतक : 24 तासात सरासरी 4 इंच

Advertisement

पणजी : पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात सरासरी 4 इंच पाऊस पडला. यामुळे यंदाच्या मौसमातील पाऊस आता 89 इंच झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सरासरीच्या तुलनेत यंदाच्या पावसाचे प्रमाण 48.5 टक्यांनी वाढले आहे. सांगे व वाळपई केंद्रांनी बुधवारी इंचाचे शतक पार केले. आजही मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला व ऑरेंज अॅलर्ट जारी केला. राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या 24 तासांमध्ये नव्याने 4 इंच पावसाची भर पडली. मौसमातील 47 दिवसांमध्ये 89 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली. सरासरीपेक्षा 29 इंच जादा पाऊस पडलेला आहे.

सत्तरी, डिचोली, धारबांदोडा आदी भागात गेले 6 दिवस नॉनस्टॉप पाऊस पडत असल्याने बागायती उत्पादनावर फरक पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी अति पावसामुळे झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढत आहे. यंदाच्या मौसमात आतापर्यंत सुमारे 6 हजारपेक्षा जास्त झाडे जमीनदोस्त झालेली आहेत. सध्याचा पाऊस हा आरोग्यावर परिणाम करणारा तर आहेच शिवाय कृषी उत्पादन घेणाऱ्यांना देखील फार अडचणीचा आहे. अनेक भागातील माडांना अति पाणी सहन होत नसल्याने कोवळे नारळच कुजून पडू लागले आहेत. सरासरी एव्हाना 60 इंच पाऊस पडतो. यंदा तो 89 इंच झालेला आहे. पुढील 4 दिवसांत देखील मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. गेल्या 24 तासांत पुढील प्रमाणे पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.