महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यात दरडीप्रवण व भुस्खलनाचा 87 गावांना धोका

11:55 AM Jun 22, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

प्रतिनिधी
गगनबावडा.
हवामान विभागाने यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. भूस्खलन होऊन 2022 च्या पावसाळ्यात राधानगरी तालुक्यातील कुपलेवाडी येथील दोघांचा मृत्यू झाला होता. गतवर्षी ईर्शाळवाडीच्या घटनेने प्रशासनाची झोप उडवली. यापुढे जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून यावर्षी जिह्यातील 87 गावांना धोका असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. यामध्ये गगनबावडा तालुक्यातील 87 गावांचा समावेश आहे.
अति पावसाच्या काळात होणारे संभाव्य धोके, जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी दरडी प्रवण व भूस्खलन होण्याची शक्यता असणाऱ्या कोल्हापूर जिह्यातील 87 गावातील लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. यात राधानगरी तालुक्यातील सर्वाधिक 30 गावांचा समावेश आहे. अतिपावसाच्या काळात दरडी कोसळणे व भूस्खलनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जनतेने राहती घरे सोडून गावातील शाळा व अन्य सार्वजनिक ठिकाणी मुक्कामी राहण्याचे आवाहन केले आहे. या गावांतील जनतेला यापुढे समर्थक रहावे लागणार आहे.
तालुकानिहाय गावे अशी : शाहूवाडी : घोळसवडे, पणुद्रे कसार्डे, कांदवण पैकी आगळेवाडी, मान पैकी ठाणेवाडी, गेळवडे, पुसारु, लोलणे करंजफेण, मार्ले, सावर्डे, शिराळा मलकापूर, विशाळगड भोसलेवाडी, शितुरवारुण, कडवे पैकी शिंदेवाडी, उकळू, पणुंद्रेपैकी हिंगणेवाडी, भेडवडे, आंबेवाडी, पन्हाळा : बाडेवाडी डोंगर, पोहाळेवाडी, गिरोली जोतीबा डोंगर, पावनगड दरड, मंगळवार पेठ पन्हाळा दरड, बुधवार पेठ परिसर, मराठवाडी, आपटी. करवीर : महे, बोलोली शिपेकरवाडी, आमशी सातेरी, खुपीरे भुदरगड : भारमलवाडी, फये, भेंगवडे, खौतवाडी, रावणवाडी, वासनोली धनगरवाडा, वासनोली पैकी जोगेवाडी, हनफोडेवाडी, टिक्केवाडी,महमदपूर. गडहिंग्लज- चिंचणेवाडी, राधानगरी- कोनोली पैकी कुपलेवाडी, पाटपन्हाळा, गैबी, शिरगांव, सावंतवाडी, मानेवाडी, खामकरवाडी, गोतेवाडी, केळोशी खुर्द, केळोशी बुद्र्रुक, पाल, तळगाव, राई, पडसाळी, मानबेट, चौके, राऊतवाडी, पोरी, कासारपुतळे, नागदेववाडी, आपटाळ, चोर वाडी, कुरुडवाडी, ऐनी धरमलेवाडी, कासारवाडा, धामणवाडी, पंडेवाडी, सोळांकूर. कागल- बोळावी, मासा बेलेवाडी, हसूर बुद्रुक हातकणंगले- रांगोळी, आजरा : वाजरे,खोत वाडी, पेरणोली, हरपवडे. चंदग : गंधरगड. गगनबावडा : शेळोशी, कडवे, बावेली, मांडुकली, अणदूर.

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Tags :
87 villages are prone to landslideskolhapur news
Next Article