For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेट्रोल टँकरच्या स्फोटात नायजेरियात 86 ठार

06:36 AM Jan 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
पेट्रोल टँकरच्या स्फोटात नायजेरियात 86 ठार
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

उत्तर-मध्य नायजेरियात पेट्रोल टँकरच्या स्फोटात 86 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटे नायजर राज्यातील सुलेजा भागाजवळ काही लोक जनरेटरचा वापर करून अपघातग्रस्त तेल टँकरमधून दुसऱ्या ट्रकमध्ये पेट्रोल ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत असताना हा स्फोट झाला. यात पेट्रोल ट्रान्सफर करणारे लोक आणि जवळच्या लोकांचा मृत्यू झाला. स्फोट इतका भयानक होता की अनेक लोकांचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतेक गरीब स्थानिक रहिवासी आहेत. सुलेजा येथील दुर्घटनेत एकंदर 55 जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजिकच्या तीन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये जिगावा राज्यात असाच एक अपघात झाला होता. या दुर्घटनेत 147 लोकांचा मृत्यू झाला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.