For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यभरात 84 तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक

10:47 AM Dec 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्यभरात 84 तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक
Advertisement

बेंगळूर : राज्य सरकारने तुमकूर, दावणगेरे, चित्रदुर्ग, शिमोग्यासह विविध जिल्ह्यांत 84 तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. यासंबंधीची यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या आयुक्तांनी या संदर्भात पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये 2025 च्या विशेष प्रशासकीय पदांसाठी 19 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन कौन्सिलिंग घेण्यात आले. त्यानुसार 84 तालुक्यांसाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव तालुका वैद्यकीय अधिकारीपदी रमेश दंडगी यांची त्याचप्रमाणे डॉ. वासंतिका नांद्रे यांची हुक्केरी तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी राजेंद्र खंडाळे यांना चिकोडी तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हावेरीचे एसएमओ असलेले निलकंठस्वामी यांना शिमोगा जिल्ह्यातील शिकारीपुरचे टीएचओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.