महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नागालँड निवडणुकीत 83 टक्के मतदान

07:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोहिमा : ईशान्य भारतातील राज्य नागालँड येथे 20 वर्षात प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होत आहे. गुरुवारी यासाठी राज्यात मतदान घेण्यात आले. एकंदर 83 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. अनेक वर्षांमध्ये प्रथमच या निवडणुका होत असल्याने मतदारांमध्ये विशेष उत्साह दिसून येत होता. 25 नागरी स्थानिक संस्थांसाठी हे मतदान झाले. राज्याच्या सर्व 10 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.

Advertisement

एक दोन किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीत निर्विरोध निवडून आलेला एनडीपीपीचा उमेदवार काही मतदानकेंद्रावर गोंधळ माजविण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. त्याला त्वरित ताब्यात घेण्यात आले. तो आणि त्याचे कार्यकर्ते यांच्याकडून काही गावठी शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या निवडणुकीत एकंदर 523 उमेदवार असून मतदारांची संख्या 2.23 लाख इतकी आहे. महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. एनडीपीपी, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, एनपीएफ, रायजिंग पीपल्स पक्ष, आरपीआय आठवले गट, संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एनपीपी हे इतके पक्ष या छोट्या राज्यात या निवडणुकीत सहभाग घेत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article