पेंडूर येथील शिबिरात 81 रक्तदात्यांचे रक्तदान
देवस्थान ट्रस्ट व संजय नाईक मित्र मंडळाचे आयोजन
कट्टा / वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या मांड उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर पेंडूर गावातील ग्रामस्थांच्या आग्रहास्तव पेंडूर येथील श्री देव वेताळ मंदिर नजीक देवस्थान ट्रस्ट व संजय नाईक मित्र मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात स्वयंस्फूर्तीने सुमारे 81 रक्तदात्यांनी रक्तदानाचे बहुमोल कार्य केले. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व ॲडव्होकेट रुपेश परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थित झाला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनायक सावंत पटेल, सचिव अमित कुळकर्णी, दीपा सावंत, सरपंच सौ नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, ग्रा.प सदस्य वैष्णवी लाड, अमित पटेल, संदेश नाईक, प्रकाश सरमळकर, डॉ. सोमनाथ परब, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे, अमित सावंत, गणेश वाईरकर, मंगेश माड्ये, अक्षय गावडे, सुरेश कांबळी, प्रदीप मीठबावकर, समीर रावले, प्रदीप सावंत, यश नाईक, गौरव नाईक, पिंट्या वालावलकर, पिंट्या परब, मनोज वायंगणकर, विजय बांदीवडेकर, आनंद परुळेकर, निलेश हडकर, आतिक शेख, आबा वारंग उपस्थित होते. या शिबिरास पडवे येथील एस एस पी एम मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयाचे डॉ. गणेश पाटील, यांच्यासह वनिता जंगले, अक्षता केळकर, चेतन सावंत, साक्षी बालम, लावण्या हडकर, प्रीती सावंत यांचे सहकार्य लाभले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, ऍड. रुपेश परुळेकर, देवस्थान ट्रस्टचे सचिव अमित कुळकर्णी, ग्रा.प. सदस्या वैष्णवी लाड यांनी संजय नाईक सर यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोमनाथ परब सूत्रसंचालन गौरव नाईक तर आभार सुमित सावंत यांनी मानले.