कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खानापुरातील आरोग्य शिबिराचा 800 रुग्णांनी घेतला लाभ

10:31 AM Dec 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नामवंत डॉक्टरांकडून तपासणी : आजपर्यंतचे सर्वात मोठे शिबिर

Advertisement

वार्ताहर/नंदगड

Advertisement

खानापूर येथील डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी खानापूर शहरातील मारुतीनगर येथील समर्थ इंग्लीश मीडियम स्कूलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहर व तालुक्यातील 800 हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. खानापूर शहरातील आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठे शिबिर पार पाडले. शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अंजली निंबाळकर, तालुका आरोग्य अधिकारी महेश किवडसन्नवर, डॉ. अनिल, बी. एल. तुक्कार आदींच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा होते. आमदार विठ्ठल हलगेकर यावेळी म्हणाले, डॉक्टर असोसिएशनने कोरोना काळात खानापुरात कोरोना सेंटर उभारून तब्बल 102 लोकांवर सामाजिक बांधिलकी म्हणून उपचार केले.

आज पर्यंतच्या इतिहासात आजचे आरोग्य शिबिर सर्वात मोठे शिबिर आहे. या शिबिराचा लाभ जनतेने घ्यावा. माजी आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या खानापुरातील रुग्णांना बेळगावला उपचारार्थ जाणे खर्चिक आहे. सदरचे शिबिर भरवून येथील ऊग्णांची चांगली सोय डॉक्टर असोसिएशनने केली आहे. यावेळी अन्य मान्यवरांची भाषणे झाली. शिबिरात नामवंत डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे लिहून दिली. तर काहींना वेगवेगळ्या तपासणी करण्यास सांगितले. गरजूना आयुष्मान भारत स्किन नोंदणीच्या साहाय्याने ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे सांगितले. नामवंत डॉक्टरांचे शिबिर खानापुरात होत असल्याने या शिबिरात मोठ्या संख्येने ऊग्ण व त्यांचे नातेवाईक दाखल झाले होते. उपस्थितांचे स्वागत डॉ. वैभव पाटील व डॉ. पी. टी. पाटील यांनी केले. यावेळी खानापूर तालुक्यातील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

दोन रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्याची जबाबदारी 

निट्टूर येथील 22 वर्षाच्या युवकाची पोलिओमुळे शरीरामधील चार व्यंगाची शल्य चिकित्सा होणार आहे. ती सर्व मोफत करण्याची जबाबदारी श्री अर्थो आणि ट्रॉमा सेंटरचे डॉ. देवेगौडा यांनी उचलली आहे. तसेच तीन महिन्यापासून एका बिहारी मुलाचा सांधा सुटला आहे. त्यासाठी लागणारी शल्य चिकित्सा करण्याचे आश्वासन डॉ. देवेगौडा यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article