कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एकाच घरात विविध धर्मीय 80 मतदार

12:44 PM Aug 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेसचे अमित पाटकर यांचा दावा

Advertisement

पणजी : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांनी बंगळुऊमध्ये उघडकीस आणलेल्या बोगस मतदारयाद्या घोटाळ्याची पुनरावृत्ती गोव्यातही झाल्याचे काँग्रेसने उघडकीस आणले आहे. त्यात दक्षिण गोव्यातील एकाच घरात तब्बल 80 मतदार राहात असल्याचे उघड झाले आहे. घोटाळ्याची परिसिमा म्हणजे एकाच घरात राहात असले तरीही हे मतदार विविध जाती धर्मातील असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

Advertisement

रविवारी पणजीत पक्षकार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष अनुक्रमे वीरेंद्र शिरोडकर, आणि सावियो डिसोझा, तसेच ओबीसी विभाग प्रमुख नितीन चोपडेकर आणि अॅड. लविना डिकॉस्ता यांची उपस्थिती होती. दक्षिण गोव्यातील बनावटगिरीचे हे ज्वलंत उदाहरण असून राज्याच्या अन्य मतदारसंघातही असेच प्रकार घडलेले असण्याची शक्यता गृहीत धरून आता काँग्रेसची टीम पुरावे गोळा करत आहे. त्याचा लवकरच पर्दाफाश करण्यात येईल, असे पाटकर यांनी सांगितले.

विधानसभेत काँग्रेसची चांगली कामगिरी

नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात तिन्ही आमदारांनी चांगली कामगिरी केल्याचे ते म्हणाले. हे तीन आमदार तीस जणांना भारी पडले. काँग्रेसकडून राज्याशी संबंधित अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर 810 प्रश्न विचारण्यात आले. त्यावरून झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते आणि पक्षाच्या आमदारांनी सरकारला जेरीस आणले, त्यांचे हे अथक प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यातून गोमंतकीयांच्या मनात काँग्रेसकडून अपेक्षा वाढल्या असल्याचा दावा पाटकर यांनी केला.

बंदर कप्तान खात्याला ‘नॉटी व्हिस्की’ची झिंग

राजधानीत मांडवी नदीत तरंगणाऱ्या ‘नॉटी व्हिस्की’ या बोटीने बंदर कप्तान खात्याच्या डोळ्यांवर एवढी झिंग चढली आहे की या बोटीत चालणारे गैरप्रकार त्यांना दिसतच नाही, असा प्रकार उघड झाला आहे, असे पाटकर यांनी सांगितले. बंदर कप्तान कार्यालयाच्या समोरच असलेल्या या बोटीस प्रत्यक्ष तीन डेक आहेत. परंतु तिच्या व्हिस्कीच्या नशेत खात्याला केवळ दोनच डेक दिसतात. खात्याच्या या अशा ‘नॉटी’ वागणुकीचा गैरफायदा घेत या बोटीत बेकायदा व्यवहार चालतात हे लक्षात येते, असे पाटकर म्हणाले. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आम्ही लवकरच या खात्याला घेराव घालणार आहोत,. या बोटीचा ‘चालविता धनी’ कोण हे त्यातून उघडकीस आणणार आहोत, असे पाटकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article