बिहारमध्ये उष्णतेमुळे 80 विद्यार्थी बेशुद्ध
शाळांना 8 जूनपर्यंत सुटी जाहीर
वृत्तसंस्था /पाटणा
उत्तर भारतातील उष्मालाटेमध्ये लोकांची प्रचंड होरपळ सुरू आहे. बिहारमध्येही पारा 48 अंशांच्या जवळ आहे. रणरणत्या उन्हामुळे बुधवारी दिवसात 80 मुले उष्णतेमुळे बेशुद्ध झाल्याचा प्रकार घडला. हवामान खात्याने राज्यात 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून सावधगिरीसाठी प्रशासनाने राज्यातील शाळांना 8 जूनपर्यंत सुटी जाहीर केली आहे. हवामान खात्याने बुधवारी पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे, रेमल चक्रीवादळामुळे ईशान्येकडील आसाम, मेघालय, अऊणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आदी राज्यांमध्ये 29 मे ते 1 जून दरम्यान पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्लीतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने पाईपने गाड्या धुणाऱ्यांना 2,000 ऊपये दंड आकारण्याचे निर्देश दिले आहेत.