आंध्र, तेलंगणात धुवाधार 24 तासांत 8 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ चेन्नई
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंध्रातील विजयवाडा येथे गेल्या 24 तासांत भूस्खलनात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुंटूरमध्ये कालव्यात 3 जण बुडाले. तेलंगणातील केसमुद्रम ते महबूबाबाद दरम्यान रेल्वे ट्रॅक वाहून गेला. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये उद्ध्वस्त झालेला रेल्वेट्रॅक दिसत आहे. रेल्वेमार्ग उखडल्यामुळे दिल्ली-विजयवाडा मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. आंध्र आणि तेलंगणातून जाणाऱ्या सुमारे 6 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 9 अन्य मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत.
तेलंगणात सोमवारीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली आहे. या इशाऱ्यामुळे सोमवारी सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथेही 5 दिवस जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये सप्टेंबरच्या सुऊवातीपासूनच पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुऊवात झाली आहे. पूर आणि भूस्खलनाची शक्मयताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गुजरातमध्येही पावसाचा जोर कायम असून वडोदरा येथे मगरी निवासी भागात घुसण्याचे प्रकार वाढले आहेत.
मध्यप्रदेशसह 12 राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात गेल्या सात दिवसांपासून गंगेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. वाराणसीतील 55 घाट गंगा नदीपात्रात बुडाले आहेत. बलियामध्ये गंगा धोक्मयाच्या चिन्हावर आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागात ऑगस्टमध्ये 253.9 मिमी पाऊस झाला. 2001 नंतरचा हा दुसरा सर्वाधिक पाऊस आहे.