For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

या आठवड्यात 8 नवे आयपीओ होणार खुले

06:58 AM Aug 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
या आठवड्यात 8 नवे आयपीओ होणार खुले
Advertisement

शेअर बाजारात वाढणार हलचल  : आठ कंपन्यांचे समभाग बाजारात होणार सूचीबद्ध

Advertisement

मुंबई : सोमवार दि. 10

ऑगस्टपासून सुरु झालेल्या आठवड्यात मेन बोर्डवर धूत ट्रान्समिशन आणि मोलबायो डायग्नोस्टीक यांच्यासह आठ नवे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. दुसरीकडे आठ कंपन्यांचे समभाग शेअर बाजारात सूचीबद्धही होणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष याकडे असणार आहे.

Advertisement

सोमवारपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात आठ नवे आयपीओ खुले होणार असून यामध्ये पाच मेन बोर्डवर खुले होतील. याशिवाय नव्या आठवड्यात आधीच खुल्या झालेल्या चार आयपीओंमध्ये पैसे गुंतविण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये दोन मेन बोर्डावर असतील.

पाहुया आयपीआंsसंबंधातील माहिती

धूत ट्रान्समिशन- सदरच्या आयपीओमधून कंपनी 3,066 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. 10 ऑगस्ट रोजी खुला झालेला कंपनीचा आयपीओ 12 ऑगस्टला गुंतवणूकीसाठी बंद होणार आहे. 829 ते 871 अशी समभागाची किंमत निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 17 समभागांचा समावेश असणार आहे. कंपनीचा समभाग शेअर बाजारात 17 ऑगस्ट रोजी सूचिबद्ध होऊ शकतो.

मोलबियो डायग्नोस्टीक - सदरचा आयपीओ 10 ऑगस्टला खुला होऊन 12 ऑगस्टला बंद होणार आहे. 939.70 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा मानस कंपनीचा आहे. 768 ते 807 रु. प्रति समभाग अशी इशू किंमत निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 18 समभागांचा समावेश असेल. 17 ऑगस्ट रोजी कंपनीचा समभाग बाजारात सूचिबद्ध होऊ शकतो.

मिल्की मिस्त डेअरी फूड- कंपनी या आयपीओ अंतर्गत 1553 कोटी रु. उभारणार आहे. 11 ऑगस्टला खुला होणारा आयपीओ 13 ऑगस्ट रोजी गुंतवणूकदारांसाठी बंद होणार आहे. 133 ते 140 रु. प्रति समभाग अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे. एका लॉटमध्ये 107 समभागांचा समावेश असेल. 18 ऑगस्ट रोजी समभाग बाजारात सूचिबद्ध होऊ शकतो.

शाम फोम- 11 ऑगस्ट रोजी खुला होणारा आयपीओ 13

ऑगस्टपर्यंत गुंतवणूकीसाठी खुला राहणार आहे. 40.48 कोटी रु. इतकी रक्कम आयपीओ अंतर्गत उभारण्याचा विचार कंपनी करत आहे. कंपनीने समभागाची किंमत 130 रु. प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. 1000 इतके समभाग एका लॉटमध्ये असणार असल्याची माहिती कंपनीने बाजाराला दिली आहे. 18 ऑगस्ट रोजी समभाग बीएसई एसएमई बाजारात लिस्ट होऊ शकतो.

फॅसिनेट टेक्सटाईल- कंपनी आयपीओच्या माध्यमातून 66.98 कोटी रु. उभारणार आहे. 11 ऑगस्ट रोजी खुला होणारा आयपीओ 13 ऑगस्टला बंद होईल. 148 ते 156 अशी इशू किंमत कंपनीने अंतिम केलेली आहे. एका लॉटमध्ये 800 समभाग असतील. एनएसई एसएमईवर समभाग 18 ऑगस्ट रोजी सुचिबद्ध होण्याची शक्यता आहे.

बेहारीलाल इंजिनिअरिंग- कंपनी आयपीओतून 302 कोटी रु. उभारण्याची योजना आखत आहे. आयपीओ गुंतवणूकीसाठी 12 ऑगस्टला खुला होणार असून यामध्ये 14 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करण्याची मुभा असणार आहे. 271 ते 285 रु. प्रति समभाग अशी इशू किंमत निश्चित करण्यात आली आहे.

एका लॉटमध्ये 52 समभागांचा समावेश असेल. 19 ऑगस्टला बीएसई व एनएसईवर समभाग सूचिबद्ध होऊ शकतो.

प्रमोदिनी मेडीकेअर- 69.04 कोटी रु. आयपीओतून उभारण्याची योजना असून 12 ऑगस्टला खुला होणारा आयपीओ 14 ऑगस्टला बंद होईल.  110 ते 118 रुपये प्रति समभाग अशी समभागाची किंमत असेल. एका लॉटमध्ये 1200 समभाग असतील. एनएसई एसएमईवर समभाग 19 ऑगस्टला सूचिबद्ध होऊ शकतो.

शिपरॉकेट- सदरची कंपनी आयपीओच्या माध्यमातून 1617 कोटी रु. उभारणार आहे. 12 ते 14 ऑगस्ट या दरम्यान आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला राहणार आहे. 92 ते 97 रु. प्रति समभाग असी इशू किंमत अंतिम असून एका लॉटमध्ये 154 समभाग असणार आहेत. 19 ऑगस्टला समभाग सूचिबद्ध होऊ शकतो.

Advertisement
Tags :

.