For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

8 मिनिटांचा राग गोठवितो रक्तवाहिन्या

06:38 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
8 मिनिटांचा राग गोठवितो रक्तवाहिन्या
Advertisement

केवळ 8 मिनिटांचा राग तुमच्या रक्तवाहिन्यांना 1 तासांपर्यंत कठोर करू शकतो. यामुळे हृदयाघात आणि स्ट्रोकचा धोका वेगाने वाढतो. एका नव्या संशोधनाने संताप आणि हृदयाच्या आरोग्यादरम्यान थेट संबंध शोधला आहे. 280 तंदुरुस्त लोकांवर करण्यात आलेलया अध्ययनातून संतापामुळे रक्तवाहिन्या फैलावण्याची क्षमता 50 टक्के कमी होत असल्याचे आणि हा प्रभाव 40 मिनिटांपर्यंत राहत असल्याचे कळले आहे.

Advertisement

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या नियतकालिकात प्रकाशित या अध्ययनात संशोधकांनी 280 तंदुरुस्त लोकांना सामील केले, त्यांना तीन समुहांमध्ये विभागण्यात आले...

-एका समुहाला संताप आणणाऱ्या जुन्या घटनेचे स्मरण करण्यास सांगितले.

Advertisement

-दुसऱ्या समुहाला दु:ख किंवा चिंता निर्माण करणारी घटना आठविली.

-तिसरा समूह तटस्थ राहिला (कुठलीच भावना नाही).

निष्कर्ष चकित करणारा

-संतापयुक्त समुहात रक्तवाहिन्या फैलावण्याची क्षमता (व्हॅस्कुलर डायलेशन) 50 टक्के कमी झाली. हा प्रभाव  राग शांत झाल्याच्या 40 मिनिटांपर्यंत राहिला.

-दु:ख किंवा चिंतेमुळे असा कुठलाच प्रभाव पडला नाही. केवळ संतापाने धमन्यांच्या अंतर्गत आच्छादनाला (एंडोथेलियम) कठोर केले, ज्यामुळे रक्तप्रवाह अवघड ठरतो.

संताप रक्तवाहिन्यांना गोठवितो, म्हणजेच त्या लवचिक राहत नाहीत आणि फैलावू शकत नाहीत. यामुळे रक्तप्रवाह थांबतो, जो हृदय आणि मेंदूसाठी धोकादायक असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

हृदयाला कशाप्रकारे नुकसान

त्वरित प्रभाव : 8 मिनिटांचा तीव्र संताप रक्तवाहिन्यांना 1 तासापर्यंत प्रभावित करतो. यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर दबाव पडतो.

दीर्घकालीन धोका : वारंवार संताप येत असल्यास हे क्यूमुलेटिव्ह नुकसान करते. रक्तवाहिन्या योग्यप्रकारे रिकव्हर होऊ शकत नाहीत, यामुळे प्लाक जमा होतो, हृदयविकाराचा धक्का बसतो, स्ट्रोक येतो, अन्य हृदरविकार वाढतात.

 

केवळ संताप का?

संताप तणाव हार्मोन (कोर्टिसोल) वाढवितो, जो एंडोथेलियमला डॅमेज करतो, दु:ख किंवा चिंतेमुळे असे घडत नाही. संताप केवळ मानसिक समस्या नाही, तर हृदय आरोग्यासाठी मोठा धोका असल्याचे कार्डियोलॉजिस्ट्सचे सांगणे आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनचे तज्ञ आता संताप नियंत्रणाला हृदयविकार प्रतिबंधाची मुख्य रणनीति मानतात.

संतापावर कसे नियंत्रण मिळवाल?

संतापावर नियंत्रण करणे हृदयाच्या रक्षणाची शास्त्राrय पद्धत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. याकरता काही सूचना करण्यात आल्या आहेत...

दीर्घ श्वास घ्या : रागाच्या क्षणी 10 सेकंद थांबून दीर्घ श्वास घेत रहावा.

एक्सरसाइज : दररोज चालल्याने किंवा योगामुळे तणाव कमी होतो.

माइंडफुलनेस : ध्यान किंवा मडिटेशनमुळे भावनांवरील नियंत्रण वाढते.

सकारात्मक विचार : संतापाऐवजी समस्यावर उपाय शोधावा.

डॉक्टरांचा सल्ला : संताप अधिक येत असल्यास थेरपी किंवा औषध घ्यावे.

अध्ययनाचे प्रमुख संशोधक डॉ. दाइडची शिम्बो (कोलंबिया विद्यापीठ) यांनी एकदा आलेला राग मोठे नुकसान करत नाही, परंतु वारंवार येणारा राग हृदयाला कमकुवत करू शकते असे म्हटले आहे. संताप रक्तवाहिन्यांना गोठवून हृदयरोगाचा धोका वाढवितो, जर तुम्हाला आरोग्यदायी रहायचे असेल तर संतापावर नियंत्रण करणे शिकावे. हे केवळ तुम्हाला दीर्घायुष्य देईल असे नाही तर आनंदीही ठेवणार आहे.

Advertisement
Tags :

.