जुने गोव्यात 44 दिवसांत 80 लाख भाविकांची भेट
व्हीलचेअर, बग्गी, राहण्याच्या व्यवस्थेमुळे वाढली गर्दी
पणजी : जुने गोवेतील सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळ्याला 44 दिवसांत सुमारे 80 लाख भाविकांनी भेट दिली. पवित्र अवशेषांचे दर्शन घेण्याचा कालावधी शनिवारी संध्याकाळी संपला. शेवटची प्रार्थनासभा (सोलोमन मास) काल रविवारी सकाळी पार पडली. त्यानंतर सी कॅथेड्रल चर्चपासून बॅसिलिका चर्चपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. शव पुन्हा बॅसिलिका चर्चमध्ये ठेवण्यात आले. 21 नोव्हेंबर रोजी सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळा सुरू झाला होता. रविवारी सकाळी 9.30 वाजता सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष सी कॅथेड्रल चर्चपासून बॅसिलिका चर्चपर्यंत मिरवणुकीतून आणले गेले. केवळ चर्चचे फादर आणि काही निवडक लोकांना मिरवणुकीत सहभागी होण्याची परवानगी होती. आर्चबिशप फिलिप नेरी फेर्राव यांच्या नेतृत्वाखाली अखेरची प्रार्थना झाली. दरम्यान, शनिवारपर्यंत भाविकांची संख्या 80 लाखांच्या पुढे गेली होती. व्हीलचेअर, बग्गी आणि राहण्याची व्यवस्था यामुळे गर्दी वाढल्याचे चर्च संस्थेने सांगितले.