For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुची येथे बेकरीस शार्ट सर्किटने आग आठ लाखाची हानी

01:43 PM Sep 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
कुची येथे बेकरीस शार्ट सर्किटने आग आठ लाखाची हानी
Advertisement

कवठेमहांकाळ

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे आरव बेकरी व जनरल स्टोअरमध्ये मंगळवारी पहाटे पांच वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत सुमारे 7लाख 65 हजार लाख ऊपयांचे फर्नीचर सह सा†हत्य जळून खाक झाले आहे.सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आली.

Advertisement

याबाबत आ†धक मा†हती अशी की, कुची येथील प्रवीण पांडुरंग पाटील यांचे कुची ते घाटनांद्रे रस्त्यावर आरव बेकरी व जनरल स्टोअर आहे. रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद शेरीमळा येथे घरी गेले.पहाटे सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास बेकरी दुकानांमध्ये आग लागण्याचे स्था†नक ग्रामस्थांच्या ा†नदर्शनास आले. आगीने रौद्ररूप धारण केले. स्था†नक ग्रामस्थांनी आग ा†वझवण्याचे प्रयत्न सुरू केले. तोपर्यंत बेकरीतील फर्निचर,दोन फ्रीज,शैक्षा†णक सा†हत्य, बेकरी सा†हत्य आगीने बा†चराख झाले.
मालक प्रा†वण पाटील यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 60 हजार ऊपये किंमतीचे दोन फ्रिज, 1लाख 25 हजार ऊपये किंमतीचे काऊंटर,80 हजार रूपये किंमतीचे लाकडी कपाट व 5 लाख रूपये किंमतीचे बेकरी पदार्थ, स्टेशनरी, गिप्ट साहित्य, जनरल दुकान साहित्य असे मिळून 7 लाख 65 हजार ऊपये किंमतीचे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी आमदार सुमनताई पाटील, युवानेते प्रभाकर बाबा पाटील तसेच कवठे महांकाळ पोलीस,सरपंच सहदेव गुरव, उपसरपंच जयसिंग पाटील यांनी तातडीने भेट दिली. तलाठी बी.ए.माने यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. बेकरीतील सा†हत्य, फर्निचर, दोन फ्रिज, शैक्षणिक साहित्य हे सर्व साहित्य जळून खाक झाले. कवठेमहांकाळ व तासगांव येथील नगरपंचायतीच्या अिशामक दलाने आग विझवण्यास मदत केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.