8 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 2.05 लाख कोटींची भर
वृत्तसंस्था/ मुंबई
आघाडीवरच्या दहापैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 205185 कोटी रुपयांनी वाढले होते. यामध्ये टेलीकॉम क्षेत्रातील भारती एअरटेलचे मूल्य सर्वाधिक वाढलेले दिसून आले. मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 1374 अंकांनी वाढला होता तर यासोबत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 417 अंकांनी वाढला होता. मागच्या आठवड्यात शेअर बाजार बऱ्यापैकी तेजीत राहिलेला दिसला. गेले काही आठवडे शेअर बाजारामध्ये म्हणावा तसा उत्साह दिसून आला नव्हता.
यांच्या मूल्यात वाढ
भारती एअरटेलचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 55653 कोटी रुपयांनी वाढत 11 लाख 97 हजार कोटींवर पोहोचले होते. बाजारातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजचे बाजार मूल्य 54 हजार 942 कोटींनी वाढत 20 लाख 55 हजार कोटींवर व एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 9149 कोटी रुपयांनी वाढत 15 लाख 21 हजार कोटी रुपयांवर पोहोचले. आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 40758 कोटी रुपयांनी वाढत 11 लाख 23 हजार कोटींवर पोहोचले .
यांच्या मूल्यात घसरण
याच दरम्यान बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 30148 कोटींनी कमी होत 6.34 लाख कोटींवर तर एलआयसीचे 9266 कोटींनी कमी होत 5.75 लाख कोटी रुपयांवर घसरले होते.