अपहरण करून 1.1 कोटी रु. लुटणाऱ्या 8 जणांना अटक
बेंगळूर : सिनेस्टाईलने दाम्पत्यासह कार चालकाचे अपहरण करून त्यांच्याकडून 1.1 कोटी ऊपये लुटणाऱ्या 8 आरोपींना अटक करण्यात हुळीमावू पोलीस यशस्वी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी आरआर नगर येथील सुपारी व्यापारी मोहन याने त्याचा कारचालक हेमंतला शहरात जाऊन पैसे आणण्यास सांगितले होते. त्यानुसार हेमंत सायंकाळी 6 च्या सुमारास हुळीमावू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अक्षय नगरातील अक्षय पार्कमध्ये जाऊन मालकाने दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल केला. कॉल आल्यानंतर रिअल इस्टेट व्यावसायिक मोटराम त्याच्या पत्नीसह कारने तेथे गेले. त्यानंतर हेमंत यांच्याशी बोलून गाडीच्या डिक्कीमध्ये पैसे ठेवण्यास सांगितले. यावेळी अचानक दोन आरोपी गाडीजवळ येऊन तुमची तपासणी करावी लागेल. खाली उतरा आम्ही तुमचा व्हिडिओ काढू, असे म्हटले. त्यापैकी एकाने मोबाईलवरून कारचे चित्रीकरण केले. यावेळी दाम्पत्याने विचारपूस केली असता संशयितांनी त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, खडबडून जागे झालेल्या दाम्पत्याने कारचा दरवाजा लॉक करून तेथून पळून काढला. तेव्हा दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करणाऱ्या संशयितांनी कारला धक्काबुक्की केली. त्यानंतर त्यांनी कार जबरदस्तीने एका निर्जन भागात नेऊन थांबवली होती.