महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘टीसीएस’च्या नफ्यात 8.7 टक्क्यांची वाढ

06:11 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

निकाल विश्लेषकांच्या अंदाजापेक्षाही अधिक : टीसीएसचा आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा अहवाल सादर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) देशातील आघाडीच्या आयटी कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल नोंदवले जे विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा चांगले राहिले आहेत. परंतु मॅक्रो आर्थिक अनिश्चिततेचा प्रभाव देखील प्रतिबिंबित करतात. आर्थिक वर्ष 2025 च्या एप्रिल-जून तिमाहीत, टीसीएसचा निव्वळ नफा 8.7 टक्क्यांनी वाढून 12,040 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, परंतु मागील तिमाहीच्या तुलनेत हा 3.1 टक्क्यांनी कमी आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत 5.4 टक्क्यांनी वाढून 62,613 कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत कंपनीचे मार्जिन 1.5 टक्क्यांनी वाढून 24.7 टक्क्यांवर पोहोचले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केल्यामुळे मार्जिनमधील सुधारणा थोडी आश्चर्याची गोष्ट आहे.

टीसीएसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक के. कृतिवासन म्हणाले की, आर्थिक वर्ष 2025 हे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चांगले असेल. टीसीएसच्या निकालांनी ब्लूमबर्गच्या अंदाजांना मागे टाकले. ब्लूमबर्गने 62,128 कोटी रुपयांचा महसूल आणि 11,959 कोटी रुपयांचा नफा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, टीसीएसने 8.3 अब्ज डॉलर किमतीचे एकूण व्यवहार केले आहेत, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीपेक्षा 18.6 टक्के कमी आणि मागील तिमाहीच्या तुलनेत 37.1 टक्के कमी आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत, टीसीएसने एकूण 13.2 अब्ज डॉलर किमतीचे करार जिंकले, जे मागील 4 ते 5 तिमाहीत सर्वाधिक होते.

कृतिवासन म्हणाले, ‘नवीन आर्थिक वर्षाची दमदार सुरुवात करताना आम्हाला आनंद होत आहे. सर्व विभाग आणि बाजारपेठांमध्ये चांगली वाढ दिसून आली. आम्ही एआयसह नवीन उपक्रमात गुंतवणूक करत राहू. अमेरिकेच्या तुलनेत भारत, लॅटिन अमेरिका आणि पश्चिम आशिया यांच्या नेतृत्वाखाली टीसीएसने उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. बीएसएनएलच्या व्यवहारामुळे भारतात कंपनीचा टर्नओव्हर 61.8 टक्क्यांनी वाढला आहे. टीसीएसची युकेमध्ये उलाढाल 6 टक्क्यांनी वाढली. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत, उत्तर अमेरिकेतील उलाढाल 1.1 टक्क्यांनी कमी झाली आहे.

5 हजार कर्मचारी घेतले

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने एकूण 5,452 ने कर्मचाऱ्यांची वाढ केली आहे आणि कंपनीने 11,000 फ्रेशर्सची नियुक्ती देखील केली आहे. 30 जून रोजी कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 6,06,998 होती. कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दरही 12.1 टक्क्यांवर आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article