For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिकोडी लोकसभेसाठी 78.63 टक्के मतदान

11:05 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिकोडी लोकसभेसाठी 78 63 टक्के मतदान
Advertisement

मतदारसंघात अनेक ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार : चोख पोलीस बंदोबस्त : उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद

Advertisement

चिकोडी : चिकोडी लोकसभा मतदारसंघात मंगळवारी किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत 78.63 टक्के मतदान झाले. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत 3 टक्के मतदानात वाढ झाली आहे. काही ठिकाणी मतदान यंत्रे सुरू होण्यास विलंब लागल्याने उशिराने मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले आहे. आता सर्वांचे लक्ष 4 जून रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे. सकाळी सात वाजताच प्रत्येक मतदान केंद्रावर कर्मचारी मतदानासाठी सज्ज झाले होते. उन्हाचा कडाका अधिक असल्यामुळे नागरिकांनी सकाळच्या टप्प्यातच अधिक प्रमाणात मतदान करण्यावर भर दिला. उन्हाचा कडाका अधिक असल्यामुळे मतदारांसाठी सावलीची व्यवस्था तसेच बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था ही करण्यात आली होती. वृद्ध व अपंग मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती. काही ठिकाणी मतदान यंत्रे सुरू होण्यास विलंब लागल्याने मतदान प्रक्रिया सुरू होण्यासही विलंब झाला. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून पोलीस व विविध पथकांचे अधिकारी प्रत्येक मतदान केंद्राला वारंवार भेट देऊन पाहणी करीत होते. निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी हिरेकोडी, बसवनाळग•s व परिसरात असलेल्या सखी व इतर मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. अनेक ठिकाणी मतदारांची संख्या 1000 वर असल्याने मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. चिकोडी लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीसाठी एकूण 17 लाख 61 हजार 694 मतदार होते. त्यापैकी सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर 2 तासात 10.81 टक्के, 11 वाजेपर्यंत 27.23 टक्के, दुपारी 1 पर्यंत 45.67 टक्के, 3 पर्यंत 59.65 टक्के, सायंकाळी 5 पर्यंत 72.75 टक्के तर 7 पर्यंत 78.51 टक्के मतदान झाले.

नेते-मान्यवरांचे मतदान

Advertisement

भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांनी पत्नी आमदार शशिकला जोल्ले, चिरंजीव ज्योतीप्रसाद जोल्ले, प्रिया जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले यांच्यासह एकसंबा येथे मतदान केले. त्याचप्रमाणे विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनीही मतदान केले. एकसंबा येथे सर्व जनता पार्टीचे उमेदवार आप्पासाहेब कुरणे यांनी पत्नी विजयलक्ष्मी कुरणे यांच्यासह मतदान केले. चिकोडी येथील चरमूर्ती मठाचे संपादना महास्वामी यांनी चिकोडीतील केंद्रावर मतदान केले. तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांनी ए. ए. पाटील महिला महाविद्यालयातील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. एकसंबा येथे भाजप उमेदवार आण्णासाहेब जोल्ले यांच्या पत्नी आमदार शशिकला जोल्ले यांनी मंगळवारी सकाळी घरासमोर भाजपाच्या कमळ चिन्हाची रांगोळी काढून मतदानाच्या उत्सवाचा आरंभ केला. त्यानंतर उमेदवार आण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, ज्योतीप्रसाद जोल्ले, प्रिया जोल्ले यांनी एकसंबा येथील मराठी शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर सर्वसामान्य रांगेत राहून मतदान केले. लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का कमी गणला जातो. पण चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत विक्रमी 78.51 टक्के मतदान झाले. चिकोडी मतदारसंघात 18 उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य मशीनबंद झाले. भाजपकडून विद्यमान खासदार आण्णासाहेब जोल्ले, काँग्रेसकडून मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी व अपक्ष म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी शंभू कल्लोळकर यांनी प्रचाराचा धडाका लावला होता. उर्वरित अपक्ष आमदारांचा प्रचार यथातथाच होता.

Advertisement
Tags :

.