कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तीन दिवसात 775 टन डाळिंबाची आवक

03:21 PM Aug 28, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

आटपाडी / सूरज मुल्ला :

Advertisement

सतरा वर्षापुर्वी सुरूवात झालेल्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळिंब सौदे बाजाराने सांगली, सातारा, सोलापुर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विश्वास संपादीत केला आहे. कर्नाटकातील शेतकरीही चांगल्या दरामुळे आटपाडी सौदे बाजारात डाळिंब विक्रीसाठी आणत आहेत. विशेष म्हणजे गत तीन दिवसात विक्रमी 775 टन डाळिंबाची आटपाडीत आवक झाली आहे.

Advertisement

तत्कालीन दुष्काळी आणि आजच्या सुकाळी आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना डाळिंबाने मोठा आधार दिला. डाळिंबामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक उन्नती झाली. अनेक संकटातून शेतकऱ्यांनी बागा फुलविल्या. त्यामुळे आटपाडीला डाळिंबाचे आगर म्हंटले जाते. डाळिंबाची शेती, उत्पादन वाढत असताना 2008 मध्ये आटपाडी बाजार समितीमध्ये डाळिंब अडतीला सुरूवात झाली.

बाजार समितीतील सौदे बाजारात चांगला दर डाळिंबाला मिळत असल्याने येथे येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणि व्याप्ती वाढली आहे. बाजार समितीचे विद्यमान सभापती संतोष पुजारी यांच्यासह संचालकांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डाळिंब सौदे बाजार यशस्वी करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न चालविले आहेत. वर्षभरात जादा डाळिंब घालणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापारी, अडतदारांसाठी मोठ्या रक्कमेची पारितोषिके देवून गौरविले जात आहे.

अडतदार, व्यापारी व शेतकऱ्यांना सुविधा देण्यासह डाळिंब सौदे बाजाराचे यशस्वी मार्केटिंगही बाजार समितीने केले आहे. त्यामुळे नियमीत आवकपेक्षा जादाची डाळिंब आवक आटपाडीमध्ये पहायला मिळत आहे. आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात 27 अडतदार आहेत. तर 55-60 लहान-मोठे व्यापारी आहेत. चांगल्या मालासह डॅमेज मालही येथे खरेदी केला जातो. शिवाय अडतदारांचेही वैयक्तिक शेतकऱ्यांसोबतचे नाते दिवसेंदिवस दृढ बनल्याने त्याचा परिणाम डाळिंबाची आवक वाढण्यात झाला आहे.
चांगल्या दराची खात्री असल्याने अहिल्यानगर, फलटण, पुणे, श्रीगोंदा, अकलुज, इंदापुर, माळशिरस, सांगोला, कासेगाव, दहीवडी, बारामती, पंढरपुरसह कर्नाटक राज्यातील शेतकरी नियमीतपणे आटपाडी बाजार समितीत डाळिंब विक्रीसाठी आणत आहेत. शेतकरी, अडतदार, व्यापाऱ्यांसह या सौदे बाजारावर अवलंबून असणारे कामगार, लहान-मोठे व्यावसायिकांनाही डाळिंब अडतीने हातभार लावला आहे.

मागील तीन दिवसात आटपाडी बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारातील डाळिंब आवकने उच्चांक गाठला आहे. तीन दिवसात आटपाडीत 38 हजार 723 क्रेट डाळिंबाची आवक झाली. म्हणजेच 775 टन इतक्या डाळिंबाची तीन दिवसात खरेदी-विक्री झाली. चांगला आणि खात्रीलायक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे डाळिंबाच्या सौद्यासाठी आटपाडीलाच प्राधान्य असल्याचे सिध्द झाले आहे. परिणामी बाजार समितीच्या उत्पन्नात सेस रूपाने घसघशीत वाढ झाली आहे. या तीन दिवसात बाजार समितीकडे साडेतीन लाखाचा सेस जमा झाला.

डाळिंबाची उच्चांकी आवक, डाळिंबाला उच्चांकी दरासह बाजार समितीच्या सेसमध्येही उच्चांकी वाढ होण्याची दुर्मिळ घटना बाजार समितीने साध्य केली आहे. पणन मंडळातर्फे करण्यात आलेल्या राज्यातील 305 बाजार समितीच्या मुल्यांकनामध्ये आटपाडी बाजार समितीने ठसा उमटविला आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवस्थापन व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पात कोल्हापूर विभागात प्रथम आणि राज्यात 22 वा क्रमांक आटपाडी बाजार समितीने पटकाविला आहे. या यशस्वी वाटचालीत डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह डाळिंब पणन संकुलाचे म्हणजेच सौदे बाजाराचेही योगदान उल्लेखनीय ठरले आहे.

आटपाडी बाजार समितीचा सभापती म्हणुन शेतकरी उन्नतीचा नवा अध्याय गतीमान केला आहे. जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवत विकासकारण सुरू आहे. शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी भरीव प्रयत्न केले आहेत. डाळिंब सौदे बाजारातून शेतकऱ्यांना चांगली सेवा आणि दर दिला जात असुन डाळिंब उत्पादकांनी आटपाडी बाजार समितीच्या सौदे बाजाराचा लाभ घ्यावा.
                                                                                                                                    -सभापती संतोष पुजारी

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article