For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्होडाफोन आयडियाला 7675 कोटीचा तोटा

06:03 AM May 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्होडाफोन आयडियाला 7675 कोटीचा तोटा
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन आयडिया यांनी मार्चअखेर संपलेल्या तिमाहीमध्ये 7675 कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. कंपनीने तोटा सहन केलेला असला तरी शुक्रवारी मात्र कंपनीचे समभाग चार टक्के तेजीसोबत बंद झाले होते.

मार्च अखेरच्या तिमाहीमध्ये 7675 कोटी रुपयांचा तोटा कंपनीने सहन केला आहे. एक वर्षाच्या मागे याच तिमाहीमध्ये कंपनीने 6419 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. तिमाहीत कंपनीने महसुलाच्या माध्यमातून 10607 कोटी रुपये मिळवले आहेत. वर्षाच्या आधी याच अवधीमध्ये 10532 कोटी रुपये महसुल कंपनीने कमावला होता.

Advertisement

कंपनीला जरी मार्चच्या तिमाहीत तोटा झाला तरी शुक्रवारी कंपनीचा समभाग शेअर बाजारामध्ये चार टक्के वाढत 13 रुपयांवरती पोहोचला होता.

Advertisement
Tags :

.