76 वर्षीय अभिनेत्री पडली प्रेमात
अभिनेत्री मेरिल स्ट्रीप अनेक वर्षांनी पुन्हा एकदा स्वत:च्या लव लाइफवरून चर्चेत आली आहे. 76 वर्षीय अभिनेत्री पुन्हा प्रेमात पडली आहे. मेरिल ही सहकलाकार मार्टिन शॉर्ट यांच्यासोबत डेटिंग करत आहे. या दोघांचे एक छायाचित्र इंटरनेटवर व्हायरल होत आहे. दोन्ही कलाकारांनी लोकप्रिय सीरिज ‘ओन्ली मर्डर इन द बिल्डिंग’मध्ये एकत्र काम केले होते. मेरिल आणि मार्टिन हे परस्परांना सध्या डेट करत आहेत. मेरिल आणि मार्टिन यांनी 2024 मध्ये परस्परांना डेट करण्यास सुरुवात केली होती. मेरिल आणि मार्टिन या दोघांनीही अद्याप स्वत:च्या रिलेशनशिपची कबुली दिलेली नाही.
मेरिल स्ट्रीप यांचा डॉन ग्रमरसोबतचा विवाह 2017 मध्ये संपुष्टात आला होता. परंतु दोघांनी तेव्हा घटस्फोट घेतला नव्हता. 2023 मध्ये अभिनेत्रीने पतीपासून विभक्त झाल्याची घोषणा केली होती. मेरिल आणि डॉन ग्रमर यांचा विवाह 1978 साली झाला होता. खासगी कारणांमुळे 45 वर्षांनी त्यांचे वैवाहिक नाते संपुष्टात आले होते. मेरिल स्ट्रीप यांना 4 अपत्यं आहेत.