महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यात 76.63 टक्के उत्स्फूर्त मतदान

01:22 PM Nov 22, 2024 IST | Radhika Patil
76.63 percent spontaneous voting in the district
Advertisement

33 लाख मतदारापैकी 25 लाख 32 हजार 657 मतदारांनी केले मतदान

Advertisement

कोल्हापूर : 
विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिह्यात 20 नोव्हेंबर रोजी उत्साहाने मतदान झाले. जिह्यात 76.63 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांसह प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याबरोबरच कोल्हापूर जिल्हावासियांनी उत्साहाने मतदान केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

Advertisement

जिह्यात 10 विधानसभा मतदारसंघात एकूण 33 लाख 5 हजार 98 मतदार आहेत. या मतदारापैकी 25 लाख 32 हजार 657 मतदारांनी मतदान केले. यामध्ये एकूण 16,69,270 पुरुषांपैकी 12,97,561 पुरुषांनी, 16,35,642 महिलापैकी 12,35,010 महिलांनी व 186 पैकी 86 इतर मतदारांनी मतदान केले. यात पुरुषांची टक्केवारी 77.73, महिलांची टक्केवारी 75.51 तर इतरांची टक्केवारी 46.24 इतकी आहे. या मतदारांची एकूण टक्केवारी 76.63 इतकी आहे.

                       जिह्यातील 10 विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी

चंदगड- पुरुष 163470, महिला 164201 व इतर 9 असे एकूण 3,27,680 मतदार आहेत. यापैकी पुरुष 1,21,774 (74.49 टक्के), महिला 1,23,918 (75.47टक्के), व इतर 3 (33.33 टक्के),अशा एकूण 2,45,695 (74.98 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

राधानगरी- पुरुष 177302, महिला 167108 व इतर 12 असे एकूण 1,44,422 मतदार आहेत. यापैकी पुरुष 1,40,315 (79.14 टक्के) महिला 1,29,365 (77.41 टक्के) व इतर 9 (75 टक्के) अशा एकूण 2,69,689 (78.30 टक्के ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

कागल -पुरुष 1,71,356, महिला 1,72,311 व इतर 5 असे एकूण 3,43,672 मतदार आहेत. यापैकी पुरुष 1,43,169 (83.55 टक्के), महिला 1,40,395 (81.48 टक्के) व इतर 4 (80 टक्के) अशा एकूण 2,83,568 (82.51 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

कोल्हापूर दक्षिण- पुरुष - 1,87,400, महिला 1,85,233 व इतर 51 असे एकूण 3,72,684 मतदार. यापैकी पुरुष 1,42,707 (76.15टक्के), महिला 1,39,007 (75.04 टक्के) व इतर 29 (56.86 टक्के) अशा एकूण 2,81,743 (75.60 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

करवीर - पुरुष 1,68,193 महिला 1,55,968 असे एकूण 3,25,161 मतदार आहेत. यापैकी पुरुष 1,44,902 (86.15 टक्के), महिला 1,31,343 (83.68 टक्के) अशा एकूण 2,76,245 (84.96 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

कोल्हापूर उत्तर- पुरुष 1,48,809, महिला 1,52,916 व इतर 18 असे एकूण 3,01743 मतदार आहेत. यापैकी पुरुष 1,00597 (67.60 टक्के), महिला 97,059 (63.47 टक्के) व इतर 10 (55.56 टक्के) अशा एकूण 1,97,666 (65.51 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

शाहूवाडी - पुरुष 1,57,316, महिला 1,48,923 व इतर 7 असे एकूण 3,06,246 मतदार आहेत. यापैकी पुरुष 1,25,620 (79.85 टक्के) महिला 1,16,363 (78.14 टक्के) व इतर 4 (57.14 टक्के) अशा एकूण 2,41,987 (79.02 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

हातकणंगले- पुरुष 1,73,449, महिला 1,68,216 व इतर 20 असे एकूण 3,41,685 मतदार आहेत. यापैकी पुरुष 1,36,055 (78.44 टक्के) महिला 1,25,145 (74.40 टक्के) व इतर 15 (75 टक्के) अशा एकूण 2,61,215 (76.45 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

इचलकरंजी - पुरुष 1,58,721, महिला 1,53,881 व इतर 62 असे एकूण 3,12,664 मतदार आहेत. यापैकी पुरुष 1,11,916 (70.51 टक्के) महिला 1,05,927 (68.84 टक्के) व इतर 10 (16.13 टक्के) अशा एकूण 2,17,853 (69.68 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

शिरोळ - पुरुष 1,63,254, महिला 1,65,885 व इतर 2 असे एकूण 3,29,141 मतदार आहेत. यापैकी पुरुष 1,30,506 (79.94 टक्के) महिला 1,26,488 (76.25 टक्के) व इतर 2 (100 टक्के) अशा एकूण 2,56,996 (78.08 टक्के) मतदारांनी हक्क बजावला.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article