For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

3 कंपन्यांच्या ‘भांडवला’त 75 हजार कोटींची वाढ

06:36 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
3 कंपन्यांच्या ‘भांडवला’त 75 हजार कोटींची वाढ
Advertisement

एसबीआय, इन्फोसिसचे मूल्य वाढले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

मागच्या आठवड्यात आघाडीवरच्या दहा पैकी तीन कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 75 हजार 855 कोटी रुपयांनी वाढले आहे. यामध्ये एसबीआय आणि इन्फोसिस यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये सर्वाधिक वाढ झाली होती. मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 5.89 अंकांनी घसरणीत राहिला होता. एनएसइ निफ्टी निर्देशांक 11.05 अंकांनी वाढला होता. आयसीआयसीआय बँक, एसबीआय आणि इन्फोसिस यांच्या बाजारमूल्यामध्ये वाढ झाली असून रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, टीसीएस, बजाज फायनान्स,  लार्सन टूब्रो यांच्या बाजार भांडवलमूल्यामध्ये एकंदरीत 75,549 कोटींची घसरण झालेली दिसून आली.

Advertisement

यांच्या मूल्यात वाढ

एसबीआयचे बाजार भांडवल मूल्य 39 हजार 45 कोटी रुपयांनी वाढत 9लाख 62 हजार 107 कोटी रुपयांवर पोहोचले. यासोबत इन्फोसिसचे बाजार भांडवल 31014 कोटी रुपयांनी वाढत 701889 कोटी रुपयांवर पोहोचले. आयसीआयसीआय बँकेचे बाजार मूल्य 5795 कोटींनी वाढत 10,09470 कोटींवर पोहोचले.

यांचे मूल्य घसरणीत

रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य 23,952 कोटी रुपयांनी कमी होत 19 लाख 72 हजार 493 कोटी रुपयांवर घसरले होते तर लार्सन टुब्रोचे बाजार भांडवल मूल्य 23 हजार 501 कोटी रुपयांनी कमी होत 5 लाख 30 हजार 410 कोटी रुपयांवर स्थिरावले. या दरम्यान एचडीएफसीचे बँकेचे बाजार भांडवल मूल्य 11615 कोटींनी कमी होत 14 लाख 32 हजार 534 कोटी आणि भारती एअरटेलचे बाजारमूल्य 6443 कोटींनी कमी होत 11,49,544 कोटी रुपयांवर घसरले होते. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 6253 कोटींनी कमी होत 5,91,447 कोटी रुपयांवर स्थिरावले.

Advertisement
Tags :

.