महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बिद्रीसाठी दुपारपर्यंत ७५ टक्के चुरशीने मतदान

03:45 PM Dec 03, 2023 IST | Kalyani Amanagi
Advertisement

४२ हजार ४१७ मतदारांनी बजावला मतदान हक्क : चार तालुक्यातील १७३ केंद्रावर मतदान सुरळीत

Advertisement

सरवडे प्रतिनिधी

Advertisement

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या व अत्यंत चुरशीची बनलेल्या बिद्री ता कागल येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी आज झालेल्या मतदानात दुपारी १२पर्यंत सुमारे ५० टक्के तर दोन पर्यंत ७५ टक्के मतदान झाले. दुपारी २ पर्यंत ५६ हजार ९१ पैकी ४२ हजार ४१७ मतदारांनी मतदान हक्क बजावला. राधानगरी भुदरगड कागल व करवीर तालुक्यातील १७३ केंद्रावर आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळपासूनच मतदार मतदान केंद्रावर येवू लागले. सकाळी दहा पासून मतदानास वेग आला. दोन्ही आघाडीतील नेते व उमेदवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदार केंद्रावर येण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. सर्वच केंद्रावर चोख बंदोबस्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या कारखान्याच्या निवडणूकीसाठी सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी आघाडी व विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन शेतकरी आघाडीमध्ये लढत आहे. शिवाय सहा अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. गेली आठवडाभर प्रचाराच्या माध्यमातून दोन्ही आघाडींनी आपली भूमिका मतदारांपर्यंत पोहचवली आहे. आज सकाळी चार तालुक्यातील १७३ केंद्रावर महिलांनी पेट्यांचे पूजन केल्यानंतर मतदानास प्रारंभ झाला. दोन्ही आघाडीचे कार्यकर्ते गावागावात बुथ मांडून मतदारांना माहिती देत होते. सकाळच्या पहिल्या सत्रात संथ गतीने मतदान सुरू झाले मात्र हळूहळू मतदानाचा वेग वाढत गेला.

Advertisement
Tags :
#bidri75percentelectiontarunbharatturnout
Next Article