कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मालवणातील ३५ मच्छिमार महिलांना ई - बाईक

05:38 PM Mar 13, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

रत्नसिंधु योजनेतून ७५ टक्के अनुदान

Advertisement

मालवण (प्रतिनिधी)

Advertisement

मासे विक्री करणाऱ्या, मासे मासे सुकवणाऱ्या, मुळे काढणाऱ्या व खेकडे पकडणाऱ्या महिला या मच्छिमार महिला आहेत आणि अशा मच्छिमार महिलांची सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्था ही महाराष्ट्रात एकमेव अशी संस्था आहे, या संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर यांनी संस्थेसाठी व मच्छिमार महिलांसाठी मोठी मेहनत घेतली आहे. याच प्रयत्न व मेहनतीमधून आज या संस्थेच्या मार्फत राज्य शासनाच्या रत्नसिंधु योजनेतून ७५ टक्के अनुदान पद्धतीने महिलांना ई बाईक प्रदान करण्यात येत असून मच्छिमार महिलांच्या व्यवसायाच्या दृष्टीने ई बाईक महत्वाच्या ठरतील, असे प्रतिपादन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे बोलताना केले.

सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेमार्फत आज तारकर्ली येथे रांजेश्वर मंदिर नजिक डॉ.केरकर व्हिला येथे सुमारे ३५ महिलांना राज्य शासनाच्या रत्नसिंधु योजनेतून ७५ टक्के अनुदान पद्धतीने ई बाईक प्रदान करण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय गाबीत समाजचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गाड्यांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर, संस्थेचे संस्थापक व गाबीत समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, मच्छिमार नेते बाबी जोगी, अरविंद मोंडकर, जॉर्डसन कोमाकी ई बाईक कंपनीचे समीर कुडाळकर यांच्यावतीने सौ. कुडाळकर, तारकर्ली काळेथरचे सरपंच दिगंबर मालंडकर, गाबीत समाज देवगडचे अध्यक्ष लक्ष्मण तारी, डॉ. जितेंद्र केरकर, तसेच संस्थेच्या संचालिका व लाभार्थी महिला आदी उपस्थित होते.

यावेळी सौ. स्नेहा केरकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यवसायिक सहकारी संस्थेमार्फत महिला मच्छीमारांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, चतुर्थीच्या सणात गेली सुमारे १२ वर्षे कमीत कमी दरात धान्य वाटप करणे, असे कार्यक्रम हाती घेण्यात येतात. आता मच्छी विक्रीसाठी अशा ई बाईक चा वापर करुन घरोघरी मच्छी विक्री करणे महिलाना अधिक सोपे व कमी कष्टाचे होणार आहे. या गाड्या महिलांना मिळवून देण्यासाठी अनेक अडचणी आल्या. मात्र त्यासाठी गाबीत समाज पदाधिकारी, मत्स्य खात्याचे अधिकारी व बँकेचे सहकार्य लाभले, असे सौ. केरकर यांनी सांगितले.

यावेळी चंद्रशेखर उपरकर यांनी महिलांना ई बाईक मिळवून देणायासाठी स्नेहा केरकर यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत यासाठी गाबीत समाजातर्फे आम्ही आवश्यक ते सहकार्य केले. येणाऱ्या काळात मच्छिमार महिलांसाठी ज्या योजना असतील त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी गाबीत समाजातर्फे प्रयत्न करू, मच्छी विक्रेत्या महिलांना दहा स्टॉल उपलब्ध करून देण्याची आमची योजना असून लवकरच ती पूर्णत्वास नेण्यात येईल, असेही चंद्रशेखर उपरकर यांनी सांगितले. तर मेघनाद धुरी यांनी मच्छिमार महिलांच्या योजनांसाठी जिल्हा बँकेचे सहकार्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले.

यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, स्नेहा केरकर यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता काम करत जिल्ह्यातील मच्छिमार महिलांना एकत्र केले व संस्था उर्जितावस्थेत ठेवली. येत्या काळात गाबीत समाजातर्फे मच्छिमार महिलांसाठी एक आरोग्य तपासणी शिबिरात घेण्यात येईल व आवश्यक ती ऑपरेशन मोफत केली जातील. मच्छिमार समाजासाठी आम्ही काम करत आहोत, यात कुठेही राजकारण आणले जात नाही, असेही उपरकर म्हणाले.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news # malvan #
Next Article