For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे 75 प्रवासी बचावले

11:06 AM Sep 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे 75 प्रवासी बचावले
Advertisement

बेंगळूर : इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर आग लागल्याने संपूर्ण बस बेचिराख झाल्याची घटना सोमवारी सकाळी बेंगळूरच्या एचएएल एअरपोर्ट मुख्य गेटजवळ घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे 75 प्रवासी असणारी बस सोमवारी सकाळी 5:15 वाजता मॅजेस्टीक स्थानकावरून निघाली होती. दरम्यान, एचएएल विमानतळ गेटजवळ बसच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. वेळीच सतर्क झालेल्या चालकाने बस थांबवून सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरविले. त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत संपूर्ण बसला आग लागली. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगा आटोक्यात आणण्यात आली. बसचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली. बेंगळूर शहर परिवहन मंडळाच्या (बीएमटीसी) अधिकाऱ्यांनी आगीचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.