For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी बुद्रुक येथे 73.53 टक्के मतदान

09:59 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी बुद्रुक येथे 73 53 टक्के मतदान
Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

Advertisement

कंग्राळी बुद्रुक येथे मंगळवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 73.53 टक्के मतदान झाले. कंग्राळी बुद्रुक येथे 13587 एकूण मतदान होते. तर 9991 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्याबरोबर दुपारी 1 वाजेपर्यंत मतदारांनी अगदी चुरशीने मतदान केले. मध्यंतरी दुपारी 1 ते 4 पर्यंत धिम्या गतीने मतदान झाले. परंतु चारनंतर परत मतदारांनी आपले अनमोल मतदान बजावण्यासाठी गर्दी केली. एकेक मतदान केंद्रावर सायंकाळी 6 नंतर रांगेत असलेल्या मतदारांचे मतदान करून घेतले. एकूण मतदान शांततेमध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदारांनी आपल्या अनमोल मतदानाचा हक्क बजावल्याचे चित्र दिसून आले.

कंग्राळी बुद्रुक येथे मतदारांसाठी एकूण 14 बूथ होते. यामध्ये मराठी प्राथमिक शाळेमध्ये 5 बूथ, कन्नड हायस्कूलमध्ये 7 बूथ तर माध्यमिक विद्यालय हायस्कूलमध्ये 2 बूथ असे एकूण 14 बूथ होते. 24 नंबर बूथवर 951 एकूण मतदान होते. 800 मतदान झाले. 25 नंबर बूथवर 1330 एकूण मतदान होते. 880 मतदान झाले. 26 नंबर बूथवर 407 एकूण मतदान होते. 326 मतदान झाले. 27 नंबर बूथवर 770 एकूण मतदान होते. 665 मतदान झाले. 28 नंबर बूथवर 767 एकूण मतदान होते. 603 मतदान झाले. 29 नंबर बूथवर 1010 एकूण मतदान होते. 732 मतदान झाले. 30 नंबर बूथवर 785  एकूण मतदान होते. 702 मतदान झाले. 31 नंबर बूथवर 1324 एकूण मतदान होते. 815 मतदान झाले. 32 नंबर बूथवर 1084 एकूण मतदान होते. 772 मतदान झाले. 33 नंबर बूथवर 628 एकूण मतदान होते. 407 मतदान झाले. 34 नंबर बूथवर 627 एकूण मतदान होते. 471 मतदान झाले.35 नंबर बूथवर 1254 एकूण मतदान होते. 874 मतदान झाले. 36 नंबर बूथवर 1145 एकूण मतदान होते. 825 मतदान झाले.  37 नंबर बूथवर 1505 एकूण मतदान होते. 1090 मतदान झाले.

Advertisement

यमनापूर येथे 81.65 टक्के मतदान

यमनापूर येथे मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी झालेले मतदान 81.65 टक्के आहे. यमनापूर येथे एकूण 1134 मतदान आहे. यापैकी 926 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

Advertisement
Tags :

.