For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अमेरिकेतील 7.2 कोटी मुलांना मिळणार स्पेसएक्सचा समभाग

07:15 AM Oct 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेतील 7 2 कोटी मुलांना मिळणार स्पेसएक्सचा समभाग
Advertisement

इलॉन मस्क यांची घोषणा : समभागांचे एकूण मूल्य 1 लाख कोटी रुपये

Advertisement

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

जगातील धनाढ्या उद्योजक इलॉन मस्क यांच्या एका घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिकेतील प्रत्येक मुलाला त्यांच्या रॉकेट निर्मिती कंपनी स्पेसएक्सचा एक समभाग भेट देण्याची योजना मस्क यांनी जाहीर केली आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास अमेरिकेतील सुमारे 7.2 कोटी मुलांना याचा लाभ मिळू शकतो. मस्क यांनी या योजनेकरता कुठलीच वयोमर्यादा सांगितलेली नाही.

Advertisement

उपलब्ध माहितीनुसार स्पेसएक्सच्या एका समभागाची किंमत 146 डॉलर्स म्हणजेच सुमारे 14 हजार रुपये आहे. या दरानुसार सर्व मुलांना प्रत्येकी एक समभाग दिल्यास एकूण मूल्य जवळपास 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. मात्र, ही गणना सांगितलेल्या समभागाच्या किमतीवर आधारित असून प्रत्यक्ष वाटपाचे मूल्य वेगळे असू शकते.

समभाग मिळणार कसे?

मस्क यांनी पुढील वर्षी समभाग देण्याची योजना मांडल्याचे सांगितले जात असले, तरीही या योजनेची अंमलबजावणी कशी होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेचे नागरिक असलेल्या मुलांनाच लाभ मिळणार की तेथील सर्व मुलांचा समावेश होणार, नवजात बालकांना समभाग मिळणार का आणि या समभागाची विक्री करता येणार का असे अनेक प्रश्न कायम आहेत.

मस्क यांची स्पेसएक्समध्ये मोठी हिस्सेदारी

30 जून 2026 पर्यंतच्या नियामक नोंदीनुसार स्पेसएक्समध्ये मस्क यांची 48.4 टक्के हिस्सेदारी असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित मूल्यांकनानुसार या हिस्सेदारीचे मूल्य सुमारे 80 लाख कोटी रुपये होते. ही योजना अनेक प्रस्तावित योजनांपैकी पहिली असल्याचेही मस्क यांनी म्हटले आहे.

अल्पवयीनांना समभाग कसे मिळतात?

अमेरिवपे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या नावावर समभाग ठेवण्यासाठी ‘कस्टोडियल अकौंट्स’ उघडण्यात येतात, यात मूल प्रौढ होईपर्यंत पूर्ण जबाबदारी आईवडिल किंवा पालकांकडे असते.

Advertisement
Tags :

.