महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूर परिमंडलात 72 कोटी वीज बिलांची थकबाकी

03:46 PM Nov 28, 2024 IST | Radhika Patil
72 crore electricity bills outstanding in Kolhapur circle
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडलामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 04 लाख 93 हजार 419 ग्राहकांकडे 72 कोटी 24 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे थकबाकी वसुलीच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आल्या असून सांगली व कोल्हापूर जिह्यातील वीज बिल न भरणाऱ्या 2342 वीज ग्राहकांचा पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे.

Advertisement

कोल्हापूर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सांगली जिह्यात 2 लाख 43 हजार 129 ग्राहकांकडे 36 कोटी 74 लाख आणि कोल्हापूर जिह्यात एकूण 2 लाख 50 हजार 290 ग्राहकांकडे 35 कोटी 50 लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजबिल वसूलीवरच महावितरणचा डोलारा अवलंबून असल्याने वीज ग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीज बिल थकवणाऱ्या 2342 ग्राहकांची वीज जोडणी तोडली

कोल्हापूर परिमंडलात अंतर्गत नोव्हेंबर महिन्यात वीज बिल थकविणाऱ्या 2342 ग्राहकांची वीज जोडणी तात्पुरत्या स्वरुपात तोडण्यात आली आहे. यामध्ये सांगली जिल्यातील 1231 ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे 69 लाखांची थकबाकी होती तर कोल्हापूर जिह्यातील 1111 ग्राहकांचा समावेश असून यांच्याकडे 42 लाखांची थकबाकी आहे.

ऑनलाईन वीज बिल भरणा करा

वीज ग्राहकांना केव्हाही व कुठूनही www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने 5 हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article