6 कंपन्यांच्या भांडवलात 71 हजार कोटींची घट
एलआयसी सर्वाधिक नुकसानीत, एसबीआय, एचडीएफसी बँक, इन्फोसिसचे मूल्य मात्र वाढले
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअरबाजारातील आघाडीवरच्या 10 पैकी 6 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात मागच्या आठवड्यात 71,414 कोटी रुपयांची घसरण दिसून आली आहे. यामध्ये एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक घसरणीत राहिले होते.
एलआयसीसह टीसीएस, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रिज यांचे बाजार भांडवल मागच्या आठवड्यात घटले होते. दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या भांडवल मूल्यात मात्र वाढ झालेली दिसून आली. यांनी एकत्रितरित्या बाजारात 62,038 कोटी रुपयांची भर घातली आहे.
कुणाचे किती घटले भांडवल
मागच्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 831 अंकांनी वाढला होता. विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 26,217 कोटींनी घटून 6,57,420 कोटी रुपयांवर राहिले होते. आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचे बाजार भांडवलही 18,762 कोटींनी घटून 14,93,980 कोटी रुपयांवर राहिले होते. आयटीसीचे बाजार भांडवल 13,539 कोटींसह 5,05,092 कोटी रुपयांवर घसरले होते. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 11,548 कोटींच्या घसरणीसह 5,58,039 कोटी रुपयांवर राहिले होते.
यांच्या भांडवलात वाढ
दुसरीकडे एसबीआयचे बाजार भांडवल 27,220 कोटी रुपयांनी वाढून 6,73,585 कोटी रुपयांवर राहिले होते. इन्फोसिसच्या बाजार भांडवलात 13,592 कोटींची भर पडली असून मूल्य 6,06,573 कोटी रुपयांवर पोहचले आहे.