For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी खुर्द येथे 71.52 टक्के मतदान : मतदानासाठी रांगा

09:54 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी खुर्द येथे 71 52 टक्के मतदान   मतदानासाठी रांगा
Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

Advertisement

कंग्राळी खुर्द येथे मंगळवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 71.52 टक्के मतदान झाले. मतदान एकूण शांततेत व उत्साहामध्ये पार पडले. कंग्राळी खुर्द येथे एकूण 12918 मतदान होते. यापैकी 9944 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच मतदान अगदी चुरशीने झाल्याचे दिसून आले. कंग्राळी खुर्द येथे एकूण 13 बूथ होते. मतदान मराठी प्राथमिक शाळेमध्ये पार पडले. सकाळी 7 पासून ते दुपारी 12 पर्यंत अगदी उत्साहात मतदान झाले. दुपारी कडक उन्हामुळे मतदारांनी उसंत घेतली तर 3 नंतर परत उत्साहात मतदान केले.

अलतगा येथे 90.62 टक्के मतदान

Advertisement

अलतगा येथील मराठी प्राथमिक शाळेमध्ये मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी 90.62 टक्के मतदान झाले. अलतगा येथे 1845 एकूण मतदान आहे. यापैकी 1672 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच मतदारांनी अगदी चुरशीने मतदान केले. मतदान अगदी शांततेत पार पडले. बूथ नं. 182 वर 924 मतदान होते. तर 857 मतदान झाले. बूथ नं. 183 वर 921 मतदान होते. तर 815 मतदान झाले.

Advertisement
Tags :

.